ETV Bharat / city

आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे पप्पू... आप नेत्या प्रीती शर्मा मेनन यांची टीका - Preeti Sharma Menon

आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे पप्पू झाले आहेत का? मुंबईच्या जनतेशी सर्वाधिक गद्दारी ही आदित्य ठाकरे यांनीच केली आहे, आप नेत्या प्रीती शर्मा मेनन यांची आदित्य ठाकरेंवर टीका.

प्रीती शर्मा मेनन
author img

By

Published : Sep 16, 2019, 8:42 PM IST

मुंबई - शहरातील आरे जंगलाबाबत वातावरण तापले असतानाच, आप नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे पप्पू झाले आहेत का? असा सवाल करत मुंबईच्या जनतेशी सर्वाधिक गद्दारी आदित्य यांनीच केली असल्याचा आरोप त्यांनी केला.

आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे पप्पू झाले आहेत का ?, आप नेत्या प्रीती शर्मा मेनन यांची आदित्य ठाकरेंवर टिका.

मुंबईतील 'आरे' जंगल बचाव मोहिमेत आता राजकीय नेते देखील सहभागी झाले आहेत. यामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.

हेही वाचा... नाणारचं झालं तेच आरेचं होईल - उध्दव ठाकरे

आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे पप्पू झाले आहेत का ? - प्रीती शर्मा मेनन

शिवसेनेला महानगरपालिकेत एखादी गोष्ट पास करायची असेल, तर ते फ्लोर मॅनेज व्यवस्थित करतात, पर्यावरण मंत्री शिवसेनेचे आहेत. आदित्य ठाकरे मुंबईकर आहेत. मुंबईबाबत आणि आरे वाचवण्यात ते विधाने करत असतात. मात्र, त्यांनी व त्यांच्या पक्षाने आरे संदर्भात केवळ चटकदार ट्विट करण्यापलीकडे काहीही केलेले नाही, अशी टीका आप पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.

हेही वाचा... अखेर आघाडीचे गणित ठरले! जागावाटपात राष्ट्रवादीची सरशी ?

..तर मी आदित्य ठाकरेंची माफी मागून त्यांना मुंबईचा हिरो बोलेल - शर्मा मेनन

आदित्य ठाकरे अशी व्यक्ती आहे, जिला एखादी गोष्ट नाही मिळाली तर ते हट्ट करायला लागतात. आदित्य यांनी आरेत मेट्रो शिरू दिली नाही, तर मी त्यांची बिनशर्त माफी मागायला तयार आहे, असेही प्रीती शर्मा मेनन यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा... अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात जागावाटपावरून युतीत रस्सीखेच​​​​​​​

मुख्यमंत्र्यांसाठी मुंबई म्हणजे सोन्याचे अंड देणारी कोंबडी - प्रीती शर्मा मेनन

देवेंद्र फडणवीस हे मुंबईकर नाहीत. त्यांना मुंबईतील नाजूक पर्यावरणीय परिस्थितीची पुरेशी जाण नाही. त्यांच्यासाठी मुंबई ही फक्त बक्कळ पैसा उभा करून देणारी रियल इस्टेट अर्थात सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष हे मोठे बिल्डर मंगल प्रभात लोढा आहेत. मुंबईकडे केवळ स्क्वेअर फुटाच्या नजरेतून पाहण्याच्या या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो, अशी टीका प्रीती यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

Intro:आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे पप्पू झाले आहेत का? जनतेशी सर्वाधिक गद्दारी हे आदित्य ठाकरे यांनी केली आहे.ते मुंबईकर आहेत.मुंबईच्या बाबत आणि आरे वाचवण्यात ते विधाने करत असतात.त्यांनी व त्याच्या पक्षाने आरे संदर्भात केवळ चटकदार ट्विट करण्यापलीकडे काहीही केलेले नाही अशी टीका आप पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी केले आहे. Body:शिवसेनेला महानागरपालिकेत एखादी गोष्ट पास करायची असेल तर ते फ्लोर मॅनेज व्यवस्थित करतात , पर्यावरण मंत्री शिवसेनेचे आहेत. देवेन्द्र फडणवीस हे मुंबईकर नाहीत , त्यांना मुंबईतील नाजूक पर्यावरनिय परिस्थितीशी पुरेशी जाण नाही. त्यांच्यासाठी मुंबई ही फक्त बक्कळ पैसा उभा करून देणारी रियल इस्टेट अर्थात सोन्याचे अंड देणारी कोंबडी देणारी आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष हे मोठे बिल्डर मंगल प्रभात लोढा असून मुंबईकडे केवळ आणि केवळ स्क्वेअर फुटाच्या नजरेतून पाहण्याचा या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो अस प्रीती शर्मा मेनन यांनी म्हटले आहे.
Conclusion:आदित्य ठाकरे अशी व्यक्ती आहे जिला एखादी गोष्ट नाही मिळाली तर ते हट्ट करायला लागतात आदित्य ठाकरे यांनी आरेत मेट्रो शिरू दिली नाही तर मी त्यांची बिनशर्त माफी मागायला तयार आहे, अस प्रीती शर्मा मेनन यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईकरांना आरे मध्ये कुठलेही विकासकामे नकोत , आमच्यासाठी ते जंगल आहे , मुंबईला पुरापासून वाचविण्यासाठी ते तसेच राहू द्यावे. राज्याच्या सत्ताधारी पुढाऱ्यांना पैशापुढे कशाचेही महत्व वाटत नाही, जर अश्विनी भिडे यांना आरेशिवाय मेट्रो उभी करणे अशक्य वाटत असेल तर त्या त्यांच्या स्वतःची अकार्यशमता दाखवत आहेत. अस आप कडून स्पष्ट करण्यात आलय.

( प्रीती शर्मा मेनन यांचा मराठी 121 व हिंदी बाईट कॅमेरामन अनिल निर्मळ लाईव्ह यु ने पाठवत आहेत.)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.