ETV Bharat / city

Mumbai Youth City : मुंबईची नवी ओळख 'तरुणाईचे शहर'; या कारणामुळे झाली वृद्धांची संख्या कमी - new identity as the city of youth

मुंबई (Mumbai) हे जागतिक दर्जाचे शहर व भारताची आर्थिक राजधानी आहे. अनेक शहरातील व गावातील तरुण नौकरी करीता इथे येतात. याच मुंबईमध्ये (Mumbai) वयोवृद्धांची संख्या कमी असून तरुणांची संख्या अधिक आहे. वयोवृद्धांच्या प्रमाणात तरुणाची संख्या सहापट अधिक आहे. यावरून मुंबई तरुणाईकडे वाटचाल करत आहे. येत्या काही वर्षात हे प्रमाण अधिक वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. (New identity as the city of youth) तरुणाईचे शहर अशी मुंबईची नवी ओळख तयार झालेली आहे.

Mumbai
मुंबई
author img

By

Published : Jul 21, 2022, 10:55 AM IST

मुंबई : मुंबई (Mumbai) हे जागतिक दर्जाचे शहर व भारताची आर्थिक राजधानी आहे. याच मुंबईमध्ये वयोवृद्धांची संख्या कमी असून तरुणांची संख्या अधिक आहे. वयोवृद्धांच्या प्रमाणात तरुणाची संख्या सहापट अधिक आहे. यावरून मुंबई तरुणाईकडे वाटचाल करत आहे. येत्या काही वर्षात हे प्रमाण अधिक वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे (New identity as the city of youth) तरुणाईचे शहर अशी मुंबईची नवी ओळख तयार झालेली आहे.

कोणत्या वयाचे किती नागरिक : मुंबईमध्ये (Mumbai) २०११ च्या जनगणने प्रमाणे १ कोटी ३० लाख नागरिकांची नोंद आहे. त्यात १८ वर्षांवरील नागरिकांची लोकसंख्या ९० लाख ७८ हजार ९५२ इतकी आहे. त्यात ६० वर्षांवरील ११ लाख ७ हजार ३९१ वयोवृद्ध नागरिक आहेत. ४५ ते ५९ वयामधील १९ लाख १६ हजार ८१४ तर १८ ते ४४ वयामधील ६० लाख ५४ हजार ७४७ नागरिक आहेत. १८ ते ४४ वयोगटातीला नागरिकांची संख्या वयोवृद्धांच्या सहापट आहे. तर ४५ ते ५९ वयाच्या नागरिकांच्या प्रमाणात तीन पट आहे. यामुळे मुंबईमध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही १८ ते ४४ वायातील नागरिकांची आहे.

मुंबईतील जन्मदर ३६ टक्क्यांनी घसरला : मुंबईमध्ये (Mumbai) २०१७ मध्ये १ लाख ५५ हजार ३८८ बालकांचे जन्म झाले. त्यावेळी जन्मदर १२.२० टक्के होता. २०१८ मध्ये १ लाख ५१ हजार १८७ बालकांचा जन्म झाला. त्यावेळी ११.८३ टक्के जन्मदर होता. २०१९ मध्ये १ लाख ४८ हजर ८९८ बालकांचा जन्म झाला. त्यावेळी जन्मदर ११.६१ टक्के इतका होता. २०२० मध्ये १ लाख २० हजार १८८ बालकांचा जन्म झाला. त्यावेळी ९.३३ टक्के इतका जन्मदर होता. २०२१ मध्ये १ लाख १३ हजार ७७८ बालकांचा जन्म झाला. त्यावेळी ८.८१ टक्के इतका जन्मदर नोंदवला गेला. २०१७ च्या तुलनेत २०२१ मध्ये जन्मदर ३६ टक्क्यांनी घसरला आहे.

कोरोनामुळे १२ हजार ८७८ वयोवृद्ध रुग्णांचा मृत्यू : मुंबईमध्ये (Mumbai) मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान गेल्या अडीच वर्षात ११ लाख २१ हजार ५४६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे मुंबईमधील १९ हजार ६३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ६० वर्षावरील १२ हजार ८७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ६० वर्षा खालील ६,७१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डायबेटिक्समुळे २०१२ ते २०२० या कालावधीत ४९ हजार ९३०, हायपरटेंशनमुळे २०१२ ते २०२० या कालावधीत २७ हजार ७४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

म्हणून वृद्धांची नोंद कमी : मुंबईमधील (Mumbai) आकडेवारी ही २०११ च्या जनगणनेवर आधारित आहे. यामुळे वृद्धांची संख्या कमी दिसत आहे. मुंबईमधील राहणीमान वेगळं असल्याने वयोवृद्ध नागरिक येथे राहत नाहीत. निवृत्त झालेले बहुसंख्य जेष्ठ नागरिक गावी जातात किंवा मुंबई बाहेर जाऊन स्थायिक होतात. यामुळे मुंबईमधील जेष्ठ नागरिकांची संख्या कमी असते, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

हेही वाचा : Melghat School Issue : अकोल्याच्या संस्थेची मेळघाटात आगळीवेगळी 'सेवा'; 14 शाळांचे स्वीकारले पालकत्व

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.