ETV Bharat / city

रुग्णांऐवजी चक्क डॉक्टरांनाच नेले स्ट्रेचरवरुन; कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक!

नायर रुग्णालयात कधी नव्हे ते यंदा पावसाचे पाणी थेट रूग्णालयात घुसले. त्यामुळे रुग्ण तर सोडाच, पण डॉक्टरही हॉस्टेलवरून वा एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये पोहचू शकत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे काही डॉक्टरांना चक्क स्ट्रेचरवर बसवून रूग्णालयाच्या इमारतीपर्यंत नेण्यात येत असल्याचे चित्र नायरमध्ये पहायला मिळाले.

Mumbai Nair hospital doctors carried on stretcher amid water in hospital
रुग्णांऐवजी चक्क डॉक्टरांनाच नेले स्ट्रेचरवरुन; कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक!
author img

By

Published : Sep 24, 2020, 8:36 AM IST

मुंबई : रुग्णालयात रुग्ण स्ट्रेचरवर पोहोचतात हे काय कुणाला सांगायला नको. पण चक्क डॉक्टर स्ट्रेचरवरून, त्यातही पीपीई किट घालून रुग्णालयात पोहचल्याचे तुम्ही कधी ऐकले वा पाहिले आहे का? वा! असे काही घडल्याचे सांगितले तर ते तुम्हाला खरे वाटेल का? पण हे खरे आहे आणि हे घडले आहे, मुंबई महानगर पालिकेच्या नायर रुग्णालयात. बुधवारी रात्रीपासून नायर रुग्णालयाबाहेर आणि काही इमारतीमध्ये पाणी साचले होते. या पाण्यातून पीपीई किटमधील निवासी डॉक्टर कसे वॉर्डपर्यंत पोहचणार हा प्रश्न रुग्णालय प्रशासन आणि निवासी डॉक्टरांना पडला होता. त्यावर स्ट्रेचरवरून डॉक्टरांना नेण्याची 'आयडीया'पुढे आली आणि मग काय मोठी कसरत करत काही डॉक्टरांना वॉर्डपर्यंत पोहचवण्यात आले. कोविड काळात रुग्णसेवेसाठी अशा बिकट परिस्थितीत वाट काढण्याच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

रुग्णांऐवजी चक्क डॉक्टरांनाच नेले स्ट्रेचरवरुन; कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक!

नायर रुग्णालयात कधी नव्हे ते यंदा पावसाचे पाणी थेट रूग्णालयात घुसले. त्यात आजच्या घडीला नायर रुग्णालय कोविडसाठी महत्वाचे असून येथे मोठ्या संख्येने रूग्ण उपचारासाठी दाखल होताना दिसतात. येथे चांगले उपचार कोविड रुग्णांना मिळत असल्याने रुग्णांचाही कल या रुग्णालयाकडे असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच येथे मोठी कोविड ओपीडीही सुरू करण्यात आली आहे. पण बुधवारी रात्री 3 वाजल्यापासून ही ओपीडी आणि रुग्णालयाचा परिसर पाण्याखाली होता. बराच वेळ पाणी जराही ओसरलेले नाही. त्यामुळे संशयीत आणि नव्या रुग्णांचे मोठे हाल होत होते. तात्पुरती ओपीडी अपघात विभागात सुरू करण्यात आली आहे. पण रुग्णालयाच्या दारात आणि संपूर्ण मुंबईतच पाणी साचल्याने रुग्णांनाही रुग्णालयात पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे आज खूपच कमी आणि ज्यांची तब्येत खूपच खालावली आहे असेच रूग्ण येत असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

दुसरीकडे डॉक्टरही हॉस्टेलवरून वा एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये पोहचू शकत नसल्याचे चित्र होते. त्यातही पीपीई किट घालून पाण्यातून कसे जायचे हा मोठा प्रश्न डॉक्टरांसमोर होता. त्यामुळे काही डॉक्टरांना चक्क स्ट्रेचरवर बसवून रूग्णालयाच्या इमारतीपर्यंत नेण्यात येत असल्याचे चित्र नायरमध्ये पहायला मिळाले. याचा एक व्हिडिओ 'ईटीव्ही भारत' च्या हाती लागला आहे. या व्हिडिओत कसे पीपीई किट घातलेल्या डॉक्टरांना स्ट्रेचरवरून नेण्यात येत आहे, कसे डॉक्टर-कर्मचारी रूग्णालयात पोहचण्याची धडपड करत आहेत हे स्पष्ट दिसत आहे. नायरमधील या सर्व कोरोना योद्ध्यांचे जितके कौतुक करावे तितके कमीच अशी भावना नक्कीच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांच्या मनात येईल याबाबत शंकाच नाही.

हेही वाचा : कोरोनाचं महासंकट अन् राज्यातल्या रुग्णालयातील बेड्सची परिस्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.