मुंबई - मुंबईमध्ये गणेशोत्सव १० दिवस धूम धडाक्यात साजरा केला जातो. आज दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे. यासाठी पालिका सज्ज झाली Mumbai Municipality ready for Ganesha immersion आहे. पालिकेने १५२ ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले असून ६३ नैसर्गिक स्थळी पालिकेने सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. Ganeshotsav 2022
अशी केलीय व्यवस्था - श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १८८ नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. प्रमुख विसर्जन Ganesha immersion स्थळी ७८६ जीव रक्षक तैनात केले जाणार आहेत. नैसर्गिक विसर्जन स्थळी आवश्यक तेथे ४५ मोटार बोट व ३९ जर्मन तराफा व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. विसर्जन स्थळी २११ स्वागत कक्ष. चांगल्या प्रकाश व्यवस्थेसाठी ३ हजार ०६९ फ्लड लाईट व ७१ सर्च लाईट व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन स्थळी वैद्यकीय सामुग्रीसह सुसज्ज असणारे १८८ प्रथमोपचार केंद्र व ८३ रुग्णवाहिका असणार आहेत. निर्माल्यापासून खत बनविण्यासाठी निर्माल्य गोळा करण्यास उपयोगी ठरणारे ३५७ निर्माल्य कलश व २८७ निर्माल्य वाहने, ४८ निरिक्षण मनोरे, विसर्जन स्थळी १३४ तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था, वाहनांची चाके वाळूमध्ये रुतू नयेत, यासाठी ४६० पौलादी प्लेटची व्यवस्था, कृत्रिम विसर्जन स्थळांची व्यवस्था, सुमारे १० हजार अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहेत. mumbai news today
श्रीगणेश मूर्ती विसर्जन ऑनलाईन नोंदणी सुविधा ही https://shreeganeshvirsarjan.com या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. Mumbai Municipality ready for one and half day Ganesha immersion
हेही वाचा Ganeshotsav 2022 : ऑनलाईन फ्रॉडपासून सावध करणारा वर्दीतला बाप्पा; पाहा व्हिडिओ