ETV Bharat / city

मुंबई महापालिकेचा 39 हजार 038.83 कोटींचा अर्थसंकल्प सादर

देशातील श्रीमंत अशा मुंबई शहराच्या महापालिकेचा सन २०२१-२२ चा ३९ हजार ०३८.८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पालिका आयुक्त इकबाल सिंग यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला.

author img

By

Published : Feb 3, 2021, 3:22 PM IST

Updated : Feb 3, 2021, 9:04 PM IST

मुंबई
मुंबई

मुंबई - जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या, देशातील श्रीमंत अशा मुंबई शहराच्या महापालिकेचा सन २०२१-२२ चा ३९ हजार ०३८.८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पालिका आयुक्त इकबाल सिंग यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला.

पालिकेचा २०२१-२२ चा अर्थसंकल्प सन २०२०-२१ पेक्षा ५ हजार ५९७.८१ कोटींनी वाढला आहे. सन २०२०-२१ मध्ये ३३ हजार ४४१.०२ कोटींचा, सन २०१९-२० चा अर्थसंकल्प ३० हजार ६९२ कोटींचा होता. तर २०१८-१९ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प २७ हजार २५८ कोटी रुपये इतका सादर करण्यात आला होता.

मुंबई
मुंबई

महसुली उत्पन्न २७ हजार ८११.५७ कोटी एवढे प्रस्तावित

महसुली उत्पन्नात सन २०२० - २१ आर्थिक वर्षात २८ हजार ४४८.३० कोटी वरून २२ हजार ५७२१३ कोटी असे सुधारित करण्यात आले होते. त्यात ५८७६.१७ कोटींने घट झाली आहे. सन २०२१-२२ मध्ये महसुली उत्पन्न २७ हजार ८११.५७ कोटी एवढे प्रस्ताविले असून ते सन २०२०- २१ पेक्षा ६३६.७३ कोटींनी कमी आहे. सन २०२१-२२ मध्ये जकाती पोटी नुकसान भरपाई म्हणून अनुदान १० हजार ५८३.०८ कोटी, मालमत्ता करापोटी ७ हजार कोटी, विकास नियोजन खात्यातून प्राप्त होणारे उत्पन्न २ हजार कोटी, गुंतवणुकीवरील व्याजापोटी ९७५.५६ कोटी, मलनिस्सारण आकारापोटी १५९८.०८ कोटी उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई
मुंबई

इतर तरतुदी

  • सागरी किनारा प्रकल्प - २००० कोटी
  • गोरेगाव मुलुंड लिंक रोड - १३०० कोटी
  • विकास नियोजन खाते - २५४६.६० कोटी
  • मुंबईचे सौंदर्यीकरण - २०० कोटी
  • कोविड संबंधी माहिती व्यवस्थापन आणि विश्लेषण प्रणाली - ५१.८९ कोटी
  • सामुदायिक शौचालये - ३२३.२० कोटी
  • पूरप्रवण क्षेत्राचे निवारण - १५० कोटी
  • रेल्वेला पुलांसाठी - ९६१.६० कोटी
  • नद्यांचे पुनरुज्जीवन - ११४९.७४ कोटी
  • उद्याने - १२६.५३ कोटी
  • वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग) - ४९.६७ कोटी
  • मुंबई अग्निशमन दल - १९९.४७ कोटी
  • महापालिका मंड्या - १२१.६३ कोटी

Last Updated : Feb 3, 2021, 9:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.