ETV Bharat / city

मुंबई महापालिका सीबीएसई मंडळाच्या १० शाळा सुरु करणार - Mumbai Municipal Corporation

२०२१- २२ या शैक्षणिक वर्षापासून हे वर्ग सुरु केले जाणार आहेत. या निर्णयामुळे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

Breaking News
author img

By

Published : Jan 18, 2021, 9:58 PM IST

मुंबई - मुंबईत आपल्या पाल्याना इंग्रजी कॉन्व्हेंट व सीबीएसई मंडळाच्या शाळांमध्ये शिकवण्याचा पालकांचा कल आहे. याची दखल घेत पालिकेच्या शिक्षण विभागाने मुंबईतील १० शाळांमध्ये सीबीएसई मंडळाच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळांमध्ये जुनिअर केजी, सिनीअर केजी पहिली ते सहावी पर्यंत प्रत्येक वर्गाची एक तुकडी असणार आहे. २०२१- २२ या शैक्षणिक वर्षापासून हे वर्ग सुरु केले जाणार आहेत. या निर्णयामुळे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

सीबीएसई मंडळाच्या शाळा-

मुंबई महापालिकेकडून इयत्ता दहावी पर्यंतच्या शाळा चालवल्या जातात. शाळांत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे मुलांच्या गुणवत्तेत दर्जात्मक वाढ होत आहे. पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल असल्याने इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे. जागतिकीकरणात टीकून राहण्याकरीता व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आर्थिक दुर्बल घटकांतील पालक सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या शाळेत परवडत नसतानाही प्रवेश घेत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने पालिका हद्दीत सीबीएसई मंडळाच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना फायदा-

के - पूर्व विभागात जोगेश्वरीतील पुनम नगरात प्रायोगिक तत्वावर शाळा सुरु करण्यात आली आहे. त्याला शिक्षण समितीची मान्यता मिळाली आहे. या शाळेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने पालिकेकडून इतर विभागातही अशा प्रकारच्या शाळा सुरु केल्यास दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. महापालिका शाळांतील मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलगू, कन्नड तसेच एमपीएस शाळांना, विद्यार्थ्यांना ज्या सुविधा दिल्या जातात. त्या सर्व सुविधा सीबीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांनाही दिल्या जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

९० टक्के प्रवेश लॉटरीपद्धतीने-

शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ९० टक्के प्रवेश लॉटरी पद्धतीने तर ५ टक्के महापौरांच्या शिफारसीनुसार दिले जाणार आहेत. तसेच ५ टक्के प्रवेश महापालिका कर्मचा-यांच्या मुलांसाठी राखीव ठेवले जाणार आहेत.

कुठे असणार शाळा -

जी- उत्तर - भवानी शंकररोड शाळा
एफ- उत्तर - कानेनगर, मनपा शाळा
के- पश्चिम - प्रतीक्षा नगर मनपा शाळा
पी- उत्तर - दिंडोशी मनपा शाळा
पी- उत्तर - जनकल्याण नवीन इमारत

एल- तुंगा व्हिलेज, नवीन इमारत
एन- राजावाडी मनपा शाळा
एम- पूर्व -२ - अझीझ बाग मनपा शाळा
एस- हरियाली व्हिलेज, मनपा शाळा विक्रोळी
टी - मिठानगर शाळा, मुलुंड

हेही वाचा- ग्रामपंचायत निकाल जाहीर; निकालानंतर सर्वच पक्षांचा विजयाचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.