ETV Bharat / city

मुंबईत लस साठा आला.. आजपासून लसीकरण सुरू, नोंदणी करून जा लसीकरणाला - कोरोना लसीकरण

मुंबई पालिकेला काल मंगळवारी १ लाख लसींचा साठा प्राप्त  झाला आहे. हा साठा आज बुधवारी सकाळी लसीकरण केंद्रांवर वितरित केल्यावर दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत मुंबईतील ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे पूर्वीप्रमाणे नियमित लसीकरण होणार आहे.

Vaccination start from tomorrow in mumbai

author img

By

Published : May 5, 2021, 4:35 AM IST

मुंबई - मुंबईमधील कोरोना लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने लसीचा तुटवडा जाणवत आहे. पालिकेला काल मंगळवारी १ लाख लसींचा साठा प्राप्त झाला आहे. हा साठा आज बुधवारी सकाळी लसीकरण केंद्रांवर वितरित केल्यावर दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत मुंबईतील ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे पूर्वीप्रमाणे नियमित लसीकरण होणार आहे. महापालिका आणि सरकारी केंद्रांवर हे लसीकरण केले जाणार आहे. तसेच ५ केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.

असे होणार लसीकरण -

४५ वर्ष व त्यावरील वयोगटामध्ये पहिला व दुसरा असे दोन्ही डोस नागरिकांना देण्यात येतील. पहिला डोस घेण्यासाठी येणाऱ्यांना कोविन अ‌ॅपमध्ये नोंदणी केलेली असणे बंधनकारक आहे. तर दुसरा डोस घेण्यासाठी थेट येणाऱ्या (वॉक इन) नागरिकांनाही लस देण्यात येईल. पहिला व दुसरा डोस अशा दोन्हीसाठी लसीकरण केंद्रांवर स्वतंत्र रांग असेल. या वयोगटातील पात्र नागरिकांचे लसीकरण करताना ८० टक्के नोंदणीकृत तर २० टक्के थेट येणारे नागरिक यांना सामावून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ही विभागणी निश्चित करण्यात आली आहे.

१८ वर्षावरील लसीकरण -

दरम्यान, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी सध्या सुरु असलेल्या महानगरपालिकेच्या ५ लसीकरण केंद्रावर प्रत्येकी ५०० नागरिक याप्रमाणे, सकाळी ९ ते ५ या नियमित वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण केवळ 'कोविन ॲप' मध्ये नोंदणी केलेल्या आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ (slot) दिलेले आहे, अशा व्यक्तींसाठी असणार आहे.

गर्दी करू नका -

लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी गर्दी करु नये, संसर्गाचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. लशींच्या मात्रांचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप त्या-त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल आणि नागरिकांना अवगत करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

१८ ते ४४ वयोगटासाठी ५ लसीकरण केंद्र -

१ बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).

२ सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)

३. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).

४. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).

५. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.