ETV Bharat / city

Amitabh Bachchan Bungalow : अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची जागा ताब्यात घेण्यासाठी मुंबई महापालिकेला कंत्राटदाराची 'प्रतीक्षा' - Complaint to Lokayukta

रस्त्याच्या रुंदीकरणासाठी प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्याची काही जागा ताब्यात घेण्यात येणार ( Amitabh Bachchan bungalow Land Possession ) आहे. मात्र कित्येक दिवसांनंतरही महानगरपालिकेला ही जागा ताब्यात घेण्यासाठी कंत्राटदार मिळालेला ( BMC Didnt Got Contractor ) नाही. त्यामुळे ही जागा ताब्यात घेण्यास टाळाटाळ केली जातेय का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन
author img

By

Published : Dec 18, 2021, 5:05 PM IST

मुंबई - एखाद्या सामान्य व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केल्यास ते बांधकाम जमीनदोस्त करण्यासाठी पालिका कारवाई करते. मात्र महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यावर कारवाई ( Amitabh Bachchan bungalow Land Possession ) करण्यास कंत्राटदार मिळत नसल्याने कारवाई करण्यात आली नसल्याचे कारण महापालिकेने लोकायुक्तांकडे दिले ( BMC Didnt Got Contractor ) आहे. अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासाठीच्या भूखंडाचा काही भाग पालिकेला रस्ता रुंदीकरणासाठी ( Juhu Road Widening ) घेतला जाणार आहे. त्यानंतरही जागा ताब्यात घेण्यासाठी पालिकेकडून टाळाटाळ केली जात आहे.

मिताभ बच्चन यांच्या बंगल्याची जागा ताब्यात घेण्यासाठी मुंबई महापालिकेला कंत्राटदाराची 'प्रतीक्षा'

बंगल्याची सुरक्षा भिंत पालिका पाडणार

जुहू येथे अभिनेते अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगला आहे. या बंगल्याबाजूला असलेला रस्ता रुंद केला जात आहे. या रुंदीकरणासाठी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची काही जागा लागणार आहे. यासाठी बंगल्याची सुरक्षा भिंत तोडावी लागणार आहे. २०१७ पासून गेले चार वर्षे पालिका ही जागा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी महापालिकेने मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यासाठी किती जागा लागणार आहे, याचा अहवाल दिल्यावर अमिताभ यांच्या बंगल्याची सुरक्षा भिंत पालिका ( Security Wall Amitabh Bunglow Demolish ) पाडणार आहे. विशेष म्हणजे अमिताभ यांनी आधीच ही जागा रस्ता रुंदीकरणासाठी देण्याचे पालिकेने कळविले आहे. मात्र त्यानंतरही गेल्या चार वर्षात ही जागा पालिकेला आपल्या ताब्यात घेता आलेली नाही.

काँग्रेसने उठवला होता आवाज

याबाबत स्थानिक काँग्रेसच्या नगरसेविका ट्यूलिप मिरिंडा ( Congress corporator Tulip Mirinda ) यांनी पालिकेच्या प्रभाग समितीमध्ये आवाज उचलला होता. त्यानंतरही जागा ताब्यात घेतली जात नसल्याने मिरिंडा यांनी लोकायुक्तांकडे तक्रार ( Complaint to Lokayukta ) केली होती. लोकायुक्त व्ही एम कानडे यांच्याकडे याबाबत सुनावणी झाली. या सुनावणीत, जुहू येथील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी त्यांच्याकडे रस्ता कंत्राटदार नाही. त्यामुळे सध्या महापालिका बच्चन यांच्या बंगल्याचा आवश्यक असलेला भाग ताब्यात घेणार नाही. पुढील आर्थिक वर्षात कंपाऊंड वॉल पाडुन पुढची कार्यवाही करु असे महापालिकेने लोकायुक्तांना सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. पालिकेचा हा अहवाल लोकायुक्तांनी मान्य केलेला नाही. पुढील सुनावणीत पालिका काय कार्यवाही करणार याचे स्पष्टीकरण मागितले असल्याची माहिती मिरिंडा यांनी दिली. अमिताभ बच्चन यांना मुंबई शहराने भरपूर काही दिले आहे. आता या शहरातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी त्यांच्या घरातील काही जागेची आवशक्यता आहे. बच्चन यांनी आपले मोठे मन करून सदर जागा पालिकेला द्यावी, असे आवाहन मिरिंडा यांनी केले आहे.

काय आहे प्रकरण

जुहूतल्या एन. एस. रस्ता क्रमांक १० येथून जुहू चंदन चित्रपटगृहाकडून इर्ला उदंचन केंद्राकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर मार्गावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या परिसरात एक शाळा, दोन मॉल आणि दोन चित्रपटगृहे आहेत. त्यामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणावर वाहतूकीती वर्दळ असते. वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांना समस्यांना सामोरे जावे लागते. याचा येथून जाणाऱ्या-येणाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. याकडे लक्ष वेधून पालिकेने या मार्गाचे ६० फुटांपर्यंत रुंदीकरण करण्याचा निर्णय घेऊन हे कामही जवळपास पूर्णही झाले आहे. संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी जंक्शनवरील के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या सत्यमूर्ती रेसिडन्सी आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याच्या आवारातील काही जागेची आवश्यकता असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यासाठी या दोघांनाही नोटीस पाठविण्यात आली होती. नोटीस मिळताच के. व्ही. सत्यमूर्ती यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयानेही स्थगिती आदेश देण्यास नकार दिल्याने पालिकेने सत्यमूर्ती रेसिडन्सीच्या आवारातील जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. अमिताभ यांनी आपल्या बंगल्यामधील काही जागा रस्तारुंदीकरण करण्यास देण्यास आधीच देण्याचे मान्य केले आहे.

अमिताभ यांची जागा देण्यास मंजुरी

जुहूतील संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी रस्त्यालगत असलेली बंगल्यांची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया मुंबई महापालिकेने सुरू केली आहे. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या आवारातील जागा ताब्यात घेण्यासाठी पालिकेने २०१७ मध्ये नोटिस पाठवली आहे. अमिताभ यांचा ‘प्रतीक्षा’ बंगला आणि त्या शेजारील उद्योजक के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या सत्यमूर्ती रेसिडन्सीच्या आवारातील सुमारे दहा फूट जागा बाधित होणार आहे. अमिताभ बच्चन यांनी जागा ताब्यात देण्यासाठी आधीच मंजुरी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.