ETV Bharat / city

विधानसभा निवडणूक 2019 : मुंबई महापालिकेतील विद्यमान 11 नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात - corporators Contesting elections vidhan sabha

मुंबई महानगरपालिकेतील विद्यमान अकरा नगरसेवक आमदार होण्यासाठी इच्छुक असल्याने विधानसभेच्या निवडणूकीत उतरले आहेत. यात शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी व मनसे या पक्षांच्या विद्यमान ११ नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर माजी चार नगरसेवक व नगरसेविकांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
author img

By

Published : Oct 6, 2019, 10:01 AM IST

मुंबई - शहरातील ३६ विधानसभा जागांवर अनेक आजी-माजी आमदार निवडणूक लढवत आहेत. तसेच अनेक नवखे उमेदवारही निवडणूकीच्या रिंगणात आहे. पण एक विशेष बाब म्हणजे यावेळी महापालिकेतील 11 विद्यमान नगरसेवक देखील आमदार बनण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

हेही वाचा... महाराष्ट्र विधानसभा : मुंबईत ३६६ उमेदवारांचे अर्ज वैध

विधानसभेसाठी विविध पक्षांकडून ९ नगरसेवकांना अधिकृत उमेदवारी दिली आहे तर दोन नगरसेवकांनी बंडाचा झेंडा उभारत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र समाजवादी पक्षाचे गटनेते व नगरसेवक रईस शेख यांना भायखळा मतदारसंघ सोडून पक्षाच्या आदेशाने मुंबईबाहेर भिवंडीत निवडणूक लढवावी लागत आहे. त्याचप्रमाणे, भाजप, शिवसेना व काँग्रेसच्या ६ माजी नगरसेवकांनीही या निवडणुकीत आपले नशीब आजमवायचा निर्णय घेतला आहे. त्यामध्येही ४ माजी नगरसेवकांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे; तर २ माजी नगरसेवकांनी मात्र बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

हेही वाचा... साताऱ्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून 108 उमेदवारी अर्ज वैध

शिवसेना आणि भाजप यांना आपल्या बंडखोर आजी व माजी नगरसेवकांची समजूत काढत त्यांचे बंड काहीही उपाययोजना करून थंड करावे लागणार आहे. सुदैवाने वडाळा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांच्याविरोधात आक्रमक होत उमेदवारीसाठी आडून बसलेल्या शिवसेनेच्या माजी महापौर व विदमान ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांची पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्याने अर्ज न भरता माघार घेतली. त्यामुळे एक ठिकाणचे बंड मोडण्यात यश आले आहे.

mumbai municipal corporation corporators Contesting elections
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

विधानसभेच्या रिंगणातील विद्यमान ११ नगरसेवक

शिवसेनेतर्फे रमेश कोरगावकर यांना भांडुप (प.) मतदारसंघात, दिलीप लांडे यांना चांदीवली मतदारसंघात तर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना वांद्रे (पूर्व) मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसतर्फे आसिफ झकेरीया यांना वांद्रे (प.) मतदारसंघात, जगदिश अमीन कुट्टी यांना अंधेरी ( पूर्व) मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच मनसेतर्फे संजय तुर्डे यांना कालिना मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. समाजवादीचे गटनेते रईस शेख हे भायखळा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी खूपच इच्छुक असताना व त्यासाठी त्यांनी पूर्वतयारीही केलेली असताना त्यांना ऐनवेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गोवंडी येथील मतदारसंघात उमेदवारी देऊन त्यांची बोळवण केली आहे. त्याचप्रमाणे, अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांनीही भायखळा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपतर्फे घाटकोपर (पूर्व) मधून विद्यमान आमदार प्रकाश मेहता यांचा पत्ता कट करून पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा... आरेमधील झाडे तोडणाऱ्या अधिकाऱ्यांना सत्तेत येताच पाकव्याप्त काश्मीरात पाठवू - आदित्य ठाकरे​​​​​​​

माजी नगरसेवकांचीही लॉटरी

शिवसेनेने माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांना मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात, यामिनी जाधव यांना भायखळा मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसनेही माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांना भांडुप (प.) मतदारसंघात, तर माजी नगरसेविका अजंता यादव यांना कांदिवली (पूर्व) मतदारसंघात उमेदवारी दिली आहे.

Intro:मुंबई - मुंबईतील ३६ विधानसभा जागांवर विद्यमान व माजी आमदार हे निवडणूक लढवत आहेत. तर दुसरीकडे आमदार होण्यासाठी इच्छुक शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी व मनसे या पक्षांच्या विद्यमान ११ नगरसेवकांनीही आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर माजी चार नगरसेवक व नगरसेविकांनाही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. Body:यामध्ये ९ नगरसेवकांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे तर दोन नगरसेवकांनी बंडाचा झेंडा उभारत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र समाजवादी पक्षाचे गटनेते व नगरसेवक रईस शेख यांना भायखळा मतदारसंघ सोडून पक्षाच्या आदेशाने मुंबईबाहेर भिवंडीत निवडणूक लढवावी लागत आहे. त्याचप्रमाणे, भाजप, शिवसेना व काँग्रेसच्या ६ माजी नगरसेवकांनीही या निवडणुकीत आपले नशीब आजमवायचा निर्णय घेतला आहे. त्यामध्येही ४ माजी नगरसेवकांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे ; तर २ माजी नगरसेवकांनी मात्र बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे शिवसेना - भाजपला आपल्या बंडखोर आजी व माजी नगरसेवकांची समजूत काढत त्यांचे "बंड" काहीही उपाययोजना करून अथवा अन्य पदांचे गाजर दाखवून "थंड" करावे लागणार आहे. सुदैवाने वडाळा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांच्याविरोधात आक्रमक होत उमेदवारीसाठी आडून बसलेल्या शिवसेनेच्या माजी महापौर व विदमान ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांची पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्याने अर्ज न भरता माघार घेतली. त्यामुळे एक बंडोबा अगोदरच थंडोबा झाल्याने सेनेने व भाजपाने विशेषतः कोळंबकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

विद्यमान ११ नगरसेवकांची यादी -
शिवसेनेतर्फे रमेश कोरगावकर यांना भांडुप (प.) मतदारसंघात, दिलीप लांडे यांना चांदीवली मतदारसंघात तर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना वांद्रे (पूर्व) मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसतर्फे आसिफ झकेरीया यांना वांद्रे (प.) मतदारसंघात, जगदिश अमीन कुट्टी यांना अंधेरी ( पूर्व) मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच मनसेतर्फे संजय तुर्डे यांना कालिना मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. समाजवादीचे गटनेते रईस शेख हे भायखळा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी खूपच इच्छुक असताना व त्यासाठी त्यांनी पूर्वतयारीही केलेली असताना त्यांना ऐनवेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गोवंडी येथील मतदारसंघात उमेदवारी देऊन त्यांची बोळवण केली आहे. त्याचप्रमाणे, अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांनीही भायखळा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपतर्फे घाटकोपर (पूर्व) मधून विद्यमान आमदार प्रकाश मेहता यांचा पत्ता कट करून पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यावरून घाटकोपरमध्ये मोठा राडाही झाला आहे.

माजी नगरसेवकांनाही लॉटरी -
शिवसेनेने माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांना मानखुर्द-- शिवाजीनगर मतदारसंघात, यामिनी जाधव यांना भायखळा मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसनेही माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांना भांडुप (प.) मतदारसंघात, काँग्रेसने माजो नगरसेविका अजंता यादव यांना कांदिवली (पूर्व) मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.