सांताक्रुझ येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक थरारक घटना घडली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या विमानाजवळच पुशबॅक वाहनाने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, विामतळावरील सुरक्षा रक्षकांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली
एअर इंडियाच्या विमान AIC-647 मुंबई-जामनगर या विमानाला पुशबॅक देणाऱ्या वाहनाला विमानतळावर अचानक आग लागली. विमान मुंबईवरून जामनगरला निघाले होते. या विमानाला रनवेवर ढकळण्यासाठी जेव्हा पुशबॅक वाहन आले आणि त्याला विमान जोडण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याच वेळी पुशबॅकला आग लागली. या विमानात ८५ प्रवाशी होते.
घटनेमुळे विमान उड्डाणास बराच उशीर झाला. अखेर ११:०४वाजता विमानाने उड्डाण केलं. आग कशी लागली याबाबत प्राधिकरणाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. विमानतळावर अशाप्रकारची घटना ही खरं तर एक चिंताजनक बाब आहे. ज्याबाबत आता सलोख चौकशी देखील केली जाण्याची शक्यता आहे.