ETV Bharat / city

Mumbai Metro : गुढीपाडव्याला मुंबईकरांना मोठी भेट; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'मुंबई मेट्रो 7, 2A'चे उद्घाटन - cm thackeray inauguration mumbai metro

मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मुंबईकरांना मोठी भेट मिळणार आहे. मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A या मेट्रो रेल्वेचे या दिवशी उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही मार्गिकेला हिरवा झेंडा ( CM Thackeray Inauguration Mumbai Metro ) दाखवतील.

Mumbai Metro
Mumbai Metro
author img

By

Published : Apr 1, 2022, 8:48 PM IST

मुंबई - मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मुंबईकरांना मोठी भेट मिळणार आहे. मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A या मेट्रो रेल्वेचे या दिवशी उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही मार्गिकेला हिरवा झेंडा ( CM Thackeray Inauguration Mumbai Metro ) दाखवतील.

मेट्रो 7 आणि 2A या मार्गावर पहिल्या टप्प्यात 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूकीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 15 किमी मार्गावर मेट्रो चालवण्यात येईल. काही मेट्रो स्थानकावरील कामे अद्याप अपूर्ण आहेत. ही कामे आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो धावेल.

मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन मार्गांवर वेळापत्रकानुसार मेट्रो चालवली गेली. जेणेकरून सुरक्षेच्या दृष्टीने उर्वरित तपासणी करून काही समस्या असतील सोडवता येतील. या मार्गावरील गाड्या दररोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत १०-११ मिनिटांच्या अंतरांनी धावतील. या गाड्यांमध्ये दररोज ३ लाखांहून अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असेल. दररोज दीडशेहून अधिक फेऱ्या होणार आहेत. मेट्रोमध्ये ९ डबे असतील.

मेट्रो बद्दल नागरिकांच्या प्रतिक्रिया

मेट्रो 2 अ' मार्ग - दहिसर पूर्व, अप्पर दहिसर स्टेशन (आनंद नगर), कंदरपाडा (रुषी संकुल), मंडपेश्वर (आयसी कॉलनी), एकसर, बोरिवली पश्चिम (डॉन बॉस्को), पहारी एकसर (शिंपोली, नंतर शिंपावली), कांदिवली पश्चिम (महावीर नगर), डहाणूकरवाडी (कामराज नगर), वलनई (चारकोप), मालाड पश्चिम, लोअर मालाड (कस्तुरी पार्क), पहारी गोरेगाव (बांगूर नगर), गोरेगाव पश्चिम, ओशिवरा (आदर्श नगर), लोअर ओशिवरा (शास्त्री नगर) आणि अंधेरी पश्चिम (डीएन नगर)

'मेट्रो-7' मार्ग - दहिसर पूर्व, ओवारीपारा, राष्ट्रीय उद्यान, देवीपारा, मागाठाणे, पोईसर (पूर्वीचे महिंद्रा अँड महिंद्रा), आकुर्ली (पूर्वीचे बांडोंगरी), कुरार (पूर्वीचे पुष्पा पार्क), दिंडोशी (पूर्वीचे पठाणवाडी), आरे, गोरेगाव ई (पूर्वीचे महानंद), जोगेश्वरी ई (पूर्वीचे जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (पूर्वीचे अंधेरी पूर्व)

मेट्रो भाडे -

०-३ किमी - १० रुपये

३-१२ किमी - २० रुपये

१२-१८ किमी - ३० रुपये

१८-२४ किमी - ४० रुपये

२४-३० किमी - ५० रुपये

हेही वाचा - Chief Minister's Explanation : माझा माझ्या सहकार्‍यांवर पूर्ण विश्वास - मुख्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.