ETV Bharat / city

Women's Day Special 2022 : महिलांसाठी ठाण्याच्या हद्दीचा विचार न करता मदत करणारी निर्भया - Mumbai police

मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रितल परुळे व त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला आहे. आज जागतिक महिला दिनाच्या ( Women's Day Special 2022 ) निमित्ताने महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रितल परुळे यांच्याशी केलेली बातचीत...

nirbhaya pathak special story
nirbhaya pathak special story
author img

By

Published : Mar 8, 2022, 6:04 AM IST

मुंबई : मुंबई पोलीस (Mumbai police) विविध कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या मुंबई पोलीस चर्चेत आहेत ते नव्याने स्थापन झालेल्या निर्भया पथकामुळे. यात मालाड पोलिसांच्या निर्भया पथकाची केलेल्या कामगिरीमुळे त्यांची चर्चा होत आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने निर्भया पथकाचे नेतृत्व करणाऱ्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रितल परुळे यांच्याशी केलेली बातचीत...

पोलिसांशी केलेली बातचीत
दोन महिन्यांच्या बाळाच्या आईचा वाचवला जीव
रितल परुळे सांगतात, "महिलांसाठी काम करताना आम्हाला अनेक घटना अनुभवायला मिळतात. अशीच एक घटना आमच्या सोबत घडली होती. आमच्या पोलीस ठाण्यात एक महिला मिसिंग असल्याची तक्रार आली होती. तक्रारीत दिलेल्या वर्णनावरून आम्ही महिलेचा शोध घेतला. संध्याकाळी सदर महिला आम्हाला सापडली. तिला आम्ही पोलिस ठाण्यात आणलं व तिची चौकशी केली. त्यावेळी, तिने आम्हाला सांगितलं तिचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे. तिला एक दोन महिन्याचं बाळ देखील आहे. सध्या ती माहेरीच असते पण यातून होणाऱ्या कौटुंबिक वादामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही तिचे समुपदेशन केले. आणि कुटुंबीयांच्या हवाली केलं.
...आणि पोलीस वेळेवर पोहोचले
त्याचबरोबर महिलेने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही तिला वेळीच वाचवू शकलो. दुसऱ्या वेळी मात्र ही महिला घराबाहेर पडली.आणि आपल्या हाताची नस कापून घेतली. निर्भया पथक तेथे पोहोचल्यावर महिला आम्हाला बेशुद्ध अवस्थेत सापडली. या महिलेवर मानसोपचार तज्ञांचे उपचार सुरू आहेत."

हेही वाचा - महिला दिन विशेष : महिला दिनावर बोलू काही...

अल्पवयीन मुलीने सोडलं घर
परुळे सांगतात, "आम्हाला एक अल्पवयीन मुलगी रात्री पेट्रोलिंग वेळी रस्त्यावरून चालताना दिसली. आम्ही तिला गाडीत बसवलं व ठाण्यात आणलं. तिची चौकशी केली असता लक्षात आलं तिला घरी अभ्यास करायला सांगितल्याने घरच्यांशी भांडण झालं होतं. त्यामुळे रागात ती जीव देण्यासाठी बाहेर पडली. तीच समुपदेशन करून आम्ही तिला पालकांकडे नेले."

हद्दीचा विचार न करता महिलांना मदत
पोलीस त्यांच्या हद्दीच्या मर्यादेमुळे नेहमीच टीकेचे विषय ठरत असतात. मात्र, मालाडचे निर्भया पथक महिलांसाठी हद्दीचा विचार न करता मदत करते. परुळे सांगतात, "चारकोप परिसरात एक 4 ते 5 वर्षाची छोटी मुलगी आढळून आली. आम्ही घटनेचं गांभीर्य ओळखून हद्दीचा विचार न करता घटना स्थळी दाखल झालो. मुलीला ताब्यात घेतलं, तिची चौकशी केली व तिला पालकांच्या हवाली केले." या पथकाच्या कामाची दखल घेत मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रितल परुळे व त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा - Female auto driver of Chhindwara : पतीच्या अपघातानंतर रेश्माने घेतला पुढाकार, मुलांच्या संगोपनासाठी चालवते ऑटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.