ETV Bharat / city

Mumbai Local Train : पावसाचा 'राडा'; मस्जिद रेल्वे स्थानकाजवळ संरक्षण भिंत कोसळली

author img

By

Published : Jul 7, 2022, 8:30 PM IST

मुंबईमध्ये सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील ( Mumbai Local Train ) मस्जिद रेल्वे स्थानकाजवळ भिंतीचा काही भाग रुळावर ( Track Wall Collapsing Near Masjid Road Station ) कोसळला. यामुळे काही काळ रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती.

track wall collapsing near masjid road station

मुंबई - मुंबईमध्ये पावसाळ्यात पडझडीचे सत्र सुरु होते. आज ( 7 जुलै ) सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील मस्जिद रेल्वे स्थानकाजवळ भिंतीचा काही भाग रुळावर ( Track Wall Collapsing Near Masjid Road Station ) कोसळला. यामुळे काही काळ रेल्वे सेवा ( Mumbai Local Train )बंद करण्यात आली. त्यानंतर दुपारी दोन तासाहून अधिकचा विशेष मेगाब्लॉक घेऊन धोकादायक भिंत पाडून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली. यादरम्यान हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

कोसळली वाहतूक बंद - मुंबईमध्ये २९ जून पासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे आज सकाळी हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर स्थानकाजवळ असलेल्या एका खासगी इमारतीमधील भिंतीचा काही भाग सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास रुळावर कोसळला. या दुर्घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा दरम्यान लोकल सेवा काही वेळ ठप्प झाली होती. भिंतीचा उर्वरित भाग पुन्हा कोसळण्याचा धोका लक्षात घेता मध्य रेल्वेने २ ते ४ या वेळेत विशेष मेगा ब्लॉक घेतला होता. सायंकाळी ४ वाजेपर्यंत भिंत पाडण्यात आली. हे काम पूर्ण झाल्यानंतर हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र, रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने हार्बर मार्गावरील लोकल २० ते २५ मिनिटं उशीराने धावत होत्या.

लोकल फेऱ्या रद्द - हार्बर मार्गावर रोज ६७६ लोकलच्या फेऱ्या होतात. परंतू, गुरुवारी सकाळी हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर स्थानकातील रुळांवर खासगी इमारतीची भिंत कोसळली. पालिका व रेल्वे कर्मचाऱ्यांनी रुळावर पडलेला भिंतीचा भाग हटवला आणि उर्वरित भिंत सुरक्षित करण्याचे काम पूर्ण केले. दरम्यान, लोकल सेवा विस्कळित झाल्याने सीएसएमटी - वडाळा दरम्यान अनेक लोकल रद्द करण्यात आल्या. या कालावधीत प्रवाशांना मध्य रेल्वेच्या दादर आणि कुर्ला स्थानकातून प्रवास करण्याची अनुमती देण्यात आली होती. याचा फटका प्रवाशांना बसला आहे.

हेही वाचा - Mumbai Rain : पालिकेच्या 'या' उपाययोजनामुळे यंदा 'मुंबईची तुंबई' नाही; मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.