ETV Bharat / city

Heavy Rain In Mumbai: पावसाचा दणका! तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस, २४ तासात ३ जखमी, वेगवान वारे वाहणार

गेल्या २४ तासात मुंबई शहर विभागापेक्षा उपनगरात सर्वाधिक पाऊस पडला आहे. आज ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान विभागाने ( Meteorological Department ) दिला आहे.

मुंबईत पावसाचा दणका
मुंबईत पावसाचा दणका
author img

By

Published : Jul 7, 2022, 12:26 PM IST

मुंबई - मुंबईत सोमवारपासून मुसळधार पाऊस ( Heavy rains in Mumbai ) पडेल, असा अंदाज हवामान विभागाने ( Meteorological Department ) वर्तवला होता. त्यानुसार सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस ( Heavy rains ) पडत आहे. गेल्या २४ तासात मुंबई शहर विभागापेक्षा उपनगरात सर्वाधिक पाऊस पडला आहे. आज ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई शहर ( Mumbai City ) व उपनगरातील वाहतूक सुरळीत सुरु आहे.

मुंबईत पावसाचा दणका

इतक्या पावसाची नोंद - गेल्या २४ तासात मुंबई शहर विभागात ८२, पूर्व उपनगरात १०९ तर पश्चिम उपनगरात १०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी सखल भागात पाणी साचले असून उपनगरात सकाळी ९ वाजल्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर पाण्याचा निचरा होऊ लागला आहे. मुंबई शहर व उपनगरातील वाहतूक सुरळीत सुरु आहे, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

वेगवान वारे वाहणार - मुंबईत सोमवारपासून ५ दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शहर आदी उपनगरात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. या वाऱ्याचा वेग ६० किलोमिटर प्रतितास इतकीही असू शकते असा इशारा हवामान विभागाने दिला असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिले आहे.

45 शॉर्ट- सर्किटचे घटना - शहरात १६ व पूर्व उपनगरात १८ व पश्चिम उपनगरात ११ अशा एकूण ४५ ठिकाणी शॉर्टसर्किट होण्याच्या घटना घडल्या आहेत. संबंधित विद्युत पुरवठा यंत्रणांना कळवून मदतकार्य रवाना करण्यात आले, असून यात कोणीही जखमी झाले नाही.

44 ठिकाणी झाडे, फांदया पडल्या - शहरात 10 , पूर्व उपनगरात 10 व पश्चिम उपनगरात 24 अशा एकूण ४४ ठिकाणी झाडे व फांद्या पडण्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. सदर तक्रारी पडताळणीकरिता संबंधित विभागांना कळविण्यात आले आहे. फांद्या तोडण्याचे व उचलण्याचे काम सुरु आहे. झाड आणि फांद्या पडून कोणीही जखमी झाले नाही.

15 ठिकाणी घरे पडली - शहरात 5 पूर्व उपनगरात 4 व पश्चिम उपनगरात 6 अशा एकूण १५ ठिकाणी घर व भिंतीचा काही भाग पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सदर तक्रारी संबंधित विभागांना कळवून मदतकार्य रवाना करण्यात आले असून त्यात कोणीही जखमी झाले नाही.

दरड कोसळणे - काल सकाळी 10.28 वाजता अग्रिशमन नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार, नागोबा चौक, हाडके चाळ, चुनाभट्टी, सायन येथे डोंगराचा काही भाग बाजुला असलेल्या चाळीतील एका घरावर पडून जखमी झालेल्या 3 लोकांना उपचारार्थ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची नावे प्रकाश सोनवणे ( वय - 40, शुभम मोनवणे ( वय - 15 ) सुरेखा विरकर ( वय - 26 ) किरकोळ जखमी झाले आहेत.

पवई मार्केट येथे आग - आज सकाळी 6.15 वाजता अग्निशमन नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार मेन रोड , हिरानंदानी , पवई येथील हायको सुपर मार्केट या तळमजला अधिक 5 माळयाच्या व्यावसायिक इमारतीमध्ये आग लागली होती. अग्निशमन दलामार्फत आग विझविण्याकरीता 8 फायर इंजिन, 5 जंबो टँकर यांच्यामार्फत आग विझविण्याचे काम चालु आहे. या सदर घटनेत अद्याप कोणीही जखमी झाल्याची माहिती प्राप्त नाही.

हेही वाचा - Mumbai Heavy Rain Update : मुसळधार पावसामुळे मुंबईची दैना! रात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.