मुंबई आज मुंबई आणि उपनगरांना परतीच्या पावसाने झोडपून काढला आहे. Maharashtra Rain दुपारी जवळपास बारा ते एकच्या दरम्यान मुंबई आणि पश्चिम उपनगर तसेच पूर्व उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई सह पूर्व उपनगरांनी पश्चिम उपनगरात दुपारपासूनच जोरदार पाऊस पडत असल्याने कामासाठी बाहेर निघालेल्या Mumbai Rain मुंबईकरांना परतीच्या पावसाचा फटका बसताना पाहिला मिळत आहे. दुपारपासूनच पडत असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईची लोकल सेवा देखील काहीशी उशिराने सुरू आहे. जोरदार पडत असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक Transport of Central Railway दहा ते पंधरा मिनिटे उशिराने सुरू आहे.
पुढील चार ते पाच दिवस गडगडाटासह पाऊस परतीचा पाऊस सुरू झाला असून या परतीच्या पावसाचा फटका मुंबई, ठाण्याला बसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढील चार ते पाच दिवस गडगडाटासह मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरामध्ये जोरदार पाऊस होणार असल्याचा हवामान विभागाकडून सांगण्यात आल आहे. तसेच मुंबई सह कोकणातील रायगड आणि रत्नागिरी मध्ये देखील पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाकडून Department of Meteorology शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ढगफुटी सदृश पाऊस शेती पिकांचे मोठे नुकसान महाराष्ट्र राज्यात परतीचा पाऊस सुरू झाला आहे. परतीच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परतीच्या पावसामुळे शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. गुरुवारी रात्रभर सोलापूर जिल्ह्यातील माढा, तालुक्यातील ढवळस, करमाळा तालुक्यातील केम परिसरात ढगफुटी सदृश्य पर्जन्यवृष्टी झाली आहे. परतीच्या पावसामुळे नद्या, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. तालुक्यातील विविध ठिकाणची वाहतुक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. तसेच या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. करमाळा तालुक्यातही जोरदार पाऊस झाला आहे. केम गावात रस्त्यावर पाणीचपाणी झाले आहे.
माढा तालुक्यातील ढवळस निमगाव रस्त्यावरील वाहतूक बंद माढा तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. माढा येथील ढवळस गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. यामुळं रस्त्यांना नदीचे स्वरुप आलं आहे. ढवळस परिसरात सलग सहा तास जोरदार पाऊस झाला आहे. या जोरदार पावसामुळं निमगाव ढवळस रोडवरील पूल वाहून गेला आहे. रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. सर्वत्र पाणी झाल्यानं रस्ते बंद झाले आहेत. ढवळस निमगाव रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.