मुंबई - येस बँक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कपिल वाधवान व धीरज वाधवान यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर करत असताना मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे, की ईडीकडून दाखल करण्यात आलेली चार्जशीट ही 60 दिवसांच्या नंतर दाखल करण्यात आल्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात येत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर जरी केला असला तरी वाधवान बंधूंना तुरुंगाबाहेर येणे सध्यातरी शक्य नाही. याचे कारण म्हणजे येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून याचा तपास अद्याप सुरू आहे.
येस बँकेकडून तब्बल 3700 कोटी रुपये हे शॉर्ट डिबेंचर म्हणून डीएचएफएलमध्ये गुंतवले होते. या साठी येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना य 600 कोटी रुपयांचा फायदा डीएचएफएल कडुन झाल्याचं सांगण्यात येत आहे . मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी या दोघांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केलेला आहे. मात्र, या दोघांनाही त्यांचे पासपोर्ट तपास अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.