मुंबई - सार्वजनिक सुट्टीचा कोणत्याही व्यक्तीला कायदेशीर अधिकार नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. दादरा-नगर हवेली पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला. त्या 2 ऑगस्टच्या दिवसाची सार्वजनिक सुटीची मागणी करणार्या याचिकेवर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा देताना आज (गुरुवारी) याचिका फेटाळून लावली. दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने 2021 मध्ये सार्वजनिक सुट्याच्या यादीतून 2 ऑगस्टचा दिवस वगळला. त्या विरोधात किशनभाई घुटिया या 51 वर्षीय सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी नवजीवन जंगल आंदोलन या संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
- काय आहे याचिका?
याचिकाकर्त्यांच्यावतीने युक्तीवाद करताना दादरा-नगर हवेली पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून 2 ऑगस्ट 1954 ला मुक्त झाल्याने या दिवशी सार्वजनिक सुट्टी दिली जात होती. 1954 ते 2020 पर्यंत ही सु टी जाहिर केली जात होते. मात्र 2021 मध्ये सार्वजनिक सुट्या जाहिर करताना 2 ऑगस्टची सुट्टी वगळण्याचा प्रशासनाने घेतला. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे दिवस सार्वजनिक सुट्ट्या असू शकतात, गुड फ्रायडेलाही सार्वजनिक सुट्टी असू शकते. तर 2 ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी का असू शकत नाही? असा सवाल याचिकाकर्त्यापी उपस्थित करत प्रशासनाचा निर्णय रद्द करून 2 ऑगस्टला सुट्टी जाहिर करण्याचे आदेश द्या, अशी विनंती केली. यावेळी खंडपीठाने यासार्वजनिक याचिकाकर्त्यांचा चांगलाच समाचार घेतला. आठवड्याच्या सुट्ट्याव्यक्तीरिक्त वर्षभरातील इतर काही महत्त्वाच्या दिवशी उदा. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, दिवाळी इ. असलेल्या सार्वजनिक सुट्ट्या म्हणजे कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक सुट्टीचा कायदेशीर अधिकार आहे, असे होत नाही असे स्पष्ट केले. आज कर्मचार्यांच्या हक्काच्या रजे व्यतिरिक्त सार्वजनिक सुट्याचे प्रमाण हे दिवसेदिवस वाढत आहे. हे वाढते प्रमाण पहाता या सर्वाजनिक सुट्ट्या कमी करणयाची वेळ आली आहे. या सुट्टीचा मुलभूत अधिकार कोणालाही नाही. तो प्रशासकिय आणि धोरणात्मक भाग आहे. कोणालाही त्याबाबत कायदेशी हक्क नाही, असे स्पष्ट करत याचिकाच फेटाळून लावली.
हेही वाचा - President meets PM : राष्ट्रपतींनी घेतली पंतप्रधानांची भेट; सुरक्षेतील त्रुटीवर केली चिंता व्यक्त