मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Param bir Singh ) यांनी 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणाचा आरोप केला होता. या प्रकरणाचा ईडीकडून ( Enforcement Directorate ) तपास सुरू आहे. या प्रकरणी ईडीने ( ED )संपत्ती जप्त करू नये यासाठी मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) अनिल देशमुख यांनी वकिलांमार्फत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा दिला आहे. 14 डिसेंबरपर्यंत याप्रकरणी कुठलीही जप्ती करू नये, असा निर्णय न्यायालयाने सोमवारी (दि.06) रोजी दिला आहे.
अनिल देशमुख यांच्यावर आरोप लावल्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या घरी छापे टाकले होते. अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांकडे असलेली संपत्ती 9 तारखेला जप्त करणार होती. या संपत्तीवर जप्ती येऊ नये म्हणून देशमुख कुटुंबीय यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (सोमवारी) मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला असून 14 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारची जप्ती करू नये, असे आदेश ईडीला दिले आहेत.
देशमुख कुटुंबीयांची मालमत्ता
ईडीने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पीएमएलए ( PMLA ) अंतर्गत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची 4 कोटी 20 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. मेसर्स प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अनिल देशमुख यांची पत्नी आरती देशमुख यांच्या मालकिची आहे. आरती देशमुख यांच्या नावावर असलेला 1.54 कोटीचा वरळीच्या फ्लॅट आणि कंपनीच्या नावावर धुतूम गांव, उरण, रायगड असेलली 2.67 कोटीची जमीन आहे.
काय आहे प्रकरण...?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे ( Sachin Waze ) यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.
हे ही वाचा - ED probe of Anil Deshmukh Son: ऋषिकेश देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा नाही; 9 डिसेंबरला पुढील सुनावणी