ETV Bharat / city

मुंबईने लसीकरणाचा 9 लाखांचा टप्पा ओलांडला

मुंबईने लसीकरणाचा 9 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत एकूण 9 लाख 2 हजार 77 लाभार्थ्यांना लस देण्यात आली असून यात आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांचा समावेश आहे.

Mumbai has crossed the 9 lakh mark of vaccination
मुंबईने लसीकरणाचा 9 लाखांचा टप्पा ओलांडला
author img

By

Published : Mar 23, 2021, 1:32 AM IST

Updated : Mar 23, 2021, 2:02 AM IST

मुंबई - शहरात मागील मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. सोमवारी मुंबईत 42 हजार 420 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 9 लाख 2 हजार 77 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरणाची आकडेवारी -

मुंबईत आज 42 हजार 420 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 35 हजार 232 लाभार्थ्यांना पहिला तर 7 हजार 188 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 9 लाख 2 हजार 77 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 7 लाख 77 हजार 163 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 24 हजार 914 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 22 हजार 984 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 92 हजार 533 फ्रंटलाईन वर्कर, 4 लाख 20 हजार 303 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 66 हजार 258 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

असे झाले लसीकरण -

मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज 23 हजार 870 तर आतापर्यंत 6 लाख 44 हजार 783 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 3 हजार 133 लाभार्थ्यांना तर एकूण 37 हजार 591 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 15 हजार 417 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत कूण 2 लाख 19 हजार 701 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

एकूण लसीकरण

आरोग्य कर्मचारी 2,22,983
फ्रंटलाईन वर्कर 1,92,533
जेष्ठ नागरिक 4,20,303
45 ते 59 वय 66,258
एकूण 9,02,077

Last Updated : Mar 23, 2021, 2:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.