ETV Bharat / city

Mumbai Corona Update - मुंबईत रुग्णसंख्येत वाढ सुरूच, 295 नवीन रुग्णांची नोंद - मुंबई कोरोना रूग्णसंख्या

पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी दिलेली साथ यामुळे मुंबईमधील रुग्णसंख्या (Mumbai Corona ) आणि मृत्यूसंख्या घटली आहे. मात्र डिसेंबर महिन्यात अनेक वेळा 200 हुन अधिक रुग्णांची नोंद ( Corona Patients in Mumbai ) झाली आहे. काल शुक्रवारी 17 डिसेंबरला पुन्हा कोरोनाचे 295 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना रूग्णसंख्या
author img

By

Published : Dec 18, 2021, 1:16 AM IST

मुंबई - मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत विषाणूच्या दोन लाटा आल्या व त्या थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी दिलेली साथ यामुळे मुंबईमधील रुग्णसंख्या (Mumbai Corona ) आणि मृत्यूसंख्या घटली आहे. मात्र डिसेंबर महिन्यात अनेक वेळा 200 हुन अधिक रुग्णांची नोंद ( Corona Patients in Mumbai ) झाली आहे. काल शुक्रवारी 17 डिसेंबरला पुन्हा कोरोनाचे 295 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

शुक्रवारी 295 नवे रुग्ण -

शहरात 17 डिसेंबरला 295 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 7 लाख 66 हजार 508 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 45 हजार 628 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 363 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1940 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 2468 दिवस इतका आहे. मुंबईमधील 19 इमारती सील करण्यात आल्या आहेत. 10 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर ( Corona Growth Rate in Mumbai ) 0.03 टक्के इतका आहे.

'या' दिवशी रुग्णसंख्या 200 च्या वर -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. जून पासून त्यात घट होऊ लागली. 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 228 रुग्ण आढळून आले. 4 डिसेंबरला पुन्हा वाढ होऊन 228, 5 डिसेंबरला 219, 8 डिसेंबरला 250, 9 डिसेंबरला 218, 11 डिसेंबरला 256, 14 डिसेंबरला 225, 15 डिसेंबरला 238, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबर 295 रुग्ण आढळून आले आहेत.

तीन वेळा शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. मुंबईमध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. त्याच प्रमाणे मृत्यूंची संख्या कमी करण्यात यश आले आहे. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात 1 ते 6 मृत्यूंची नोंद होत होती. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला शून्य रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर 15 डिसेंबरला तिसऱ्यांदा शुन्य रुग्णांची नोंद झाली आहे. मृत्यू संख्या शून्य होत असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.