ETV Bharat / city

मुंबईत डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण, शिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक - डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण

मुंबई शहरात डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीत डिलिव्हरी बॉय जखमी झाला आहे. शहरातील कांदिवली भागात हा प्रकार घडला असून या प्रकरणी शिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

डिलिव्हरी बॉय
डिलिव्हरी बॉय
author img

By

Published : Jul 30, 2021, 4:28 PM IST

मुंबई - मुंबईत डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीत डिलिव्हरी बॉय जखमी झाला आहे. शहरातील कांदिवली भागात हा प्रकार घडला असून या प्रकरणी शिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

मुंबईत डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण, चौघांना अटक

पार्सलला पाय लागल्याच्या भांडणातून डिलेव्हरी बॉयला मारहाण

राहुल शर्मा असे या डिलिव्हरी बॉयचे नाव असून तो एका ई-कॉमर्स साईटसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून कामास आहे. राहुल कांदिवली पूर्व विभागात रहिवासी असून तो पोईसर परिसरात डिलिव्हरी देण्यासाठी गेला असता मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे त्याने पोईसर शिवाजी मैदान परिसरात असलेल्या शिवसेना शाखेजवळ आसरा घेतला. राहुल थांबलेल्या ठिकाणी शिवसेनेचा कार्यकर्ता चंद्रकांत निनवे हा दाखल झाला आणि त्याने राहुल शर्मा याच्याकडील पार्सलवर पाय ठेवला. त्यावेळी राहुल याने चंद्रकांत यांना पार्सलवरुन पाय हटविण्यास सांगितले. त्यानंतर राहुल आणि चंद्रकांत यांच्यात बाचाबाची सुरू झाली. व नंतर सहा जणांनी मिळून राहुल यास मारहाण केली. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापेैकी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा - CBSE 12 वीचा लागला 99% निकाल, या वेबसाईटवर बघा तुमचा निकाल

हेही वाचा - Tokyo Olympic : शाब्बाश पोरी! लवलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीत; भारताचे पदक पक्के

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.