ETV Bharat / city

क्रूझ ड्रग्स पार्टीवरुन राणे-मलिक यांच्यात जुंपली.. सावध राहा तुमच्याच घरात कोणीतरी घुसेल - नवाब मलिक - नवाब मलिक

आर्यन खान प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर टीका करणारे भाजपचे आमदार नितेश राणे यांना मलिक यांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. 'कधी तरी तुमच्याच घरात कुणीतरी घुसेल आणि तुमचेच लोक तुरुंगात जातील,' असा इशारा मलिक यांनी दिला आहे. या प्रकरणावरून दोघांमध्ये चांगलेच द्वंद्व रंगले आहे.

nawab malik
nawab malik
author img

By

Published : Oct 10, 2021, 5:38 PM IST

मुंबई - क्रूझवरील ड्रग्स पार्टीवर एनसीबीने केलेल्या कारवाईवरुन आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते मलिक आणि भाजपचे नितेश राणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादीने एनसीबीच्या कारवाईचा भंडाफोड केल्यानंतर भाजपकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी खानला वाचविण्यासाठी मलिक यांची आदळाआपट सुरु असल्याचा टोला ट्विटवरुन लगावला आहे. तर सावध राहा, तुमचेच लोक आतमध्ये कधी जातील, हे कळणार सुध्दा नाही, असा सुचक इशारा मलिक यांना दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

आर्यन खान मुस्लिम असल्यामुळं मलिकांची आदळआपट - राणे

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने केलेल्या कारवाईवर नवाब मलिक सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. ड्रग्ज पार्टीत भाजपशी संबंधित लोक होते. त्यांना सोडण्यात आले. ज्या काही लोकांना अटक करण्यात आली, त्यांना एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जाणारे भाजपचे कार्यकर्ते होते, असा गौप्यस्फोट करत मलिक यांनी काही फोटो आणि व्हिडिओ पुरावेही सादर केले आहेत. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजपने मलिक यांच्यावर टीका सुरू केली आहे. 'सुशांतसिंह राजपूत हा हिंदू असल्यामुळं त्याच्या मृत्यूबाबत नवाब मलिक यांनी आवाज उठवला नाही. पण आर्यन खान मुस्लिम असल्यामुळं ते आता बोलत आहेत,' असा आरोप भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केला आहे.

हे ही वाचा - Lakhimpur Case : केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा घ्या - नवाब मलिक

क्रुझवरील पार्टीत शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानसह सात जणांना एनसीबीने अटक केली. एनसीबीने आर्यन खानला अटक केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनबीसीच्या कारवाईचे व्हिडिओ प्रसिद्ध करत, जोरदार आक्षेप घेतला. भाजपच्या नेत्यांनी यावरुन मलिक यांना टार्गेट केले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी एक ट्वीट करत नवाब मलिकांची आदळआपट का सुरु? कारण तो खान आहे, सुशांतसिंह राजपूत नाही. खान आडनाव असल्यामुळे तो पीडित ठरतो का? सुशांत सिंह राजपूत हिंदू होता, म्हणून तो व्यसनाधीन होतो का? असे प्रश्न राणे यांनी ट्वीटवरुन उपस्थित केले आहेत.

हे ही वाचा - Cruise Drug Party Case : क्रुझवरील ड्रग्स प्रकरणी गोरेगावातून एका नायजेरियन व्यक्तीला अटक

तुमचेच लोक तुरुंगात जातील, हे कळणार नाही -मलिक

मलिक यांनी राणे यांना प्रश्नाला जशास तसे प्रतिउत्तर दिले आहे. नितेश राणे जे बोलत आहेत हीच कारणे आर्यन खानला अटक करण्यामागे आहेत. भाजपच्या लोकांनी सगळ फ्रेम केले असून ज्या पद्धतीने भाजप नेते बोलत आहेत त्यातून हेच सिध्द होते. ज्या वेळी भाजपवाले अडचणीत येतात, त्यावेळी धर्मांची ढाल पुढे करतात, असे मलिक यांनी सांगितले. तसेच राणे यांनी सावध राहावे. कधी तुमच्या घरात कोणी घुसेल आणि तुमचेच लोक तुरुंगात जातील, हे कळणार नाही, असा सल्ला नवाब मलिक यांनी नितेश राणे यांना दिला आहे. तसेच एनसीबीच्या कारवाई विरोधात उपस्थित केलेल्या प्रश्नांचा खुलासा करावा, असेही मलिक म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.