मुंबई - मुंबई क्राईम ब्रांचकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे (mumbai crime branch seized drug). गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने चेंबूर - शिवडी रोड येथून नायजेरियन ड्रग विक्रेत्याला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 200 ग्राम कोकेन आणि 5 किलो एमडी ड्रग जप्त केले आहे.
हेही वाचा - रामदास कदम यांच्या भात्यातील बाण नेमका कोणाला भेदणार
चेंबूरमधील नायजेरियन ड्रग्स पेडलरकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्स आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मुंबई क्राईम ब्रांचकडून ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या ड्रगची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत 5 कोटी 40 लाख रुपये इतकी आहे.
नायजेरियन ड्रग पेडलरला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने 25 नोव्हेंबर पर्यंत आरोपीला क्राईम ब्रांच कस्टडीत पाठवले आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का? या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे.
हेही वाचा - वनरक्षक ढुमणेंच्या कुटुंबाला १५ लाखांची मदत, पतीला नोकरी; मुख्यमंत्र्यांची घोषणा