ETV Bharat / city

लग्न करण्याआधीच त्याने कट रचून केली प्रेयसीची हत्या

या घटनेत जीव गमावलेल्या प्रेयसीचे नाव मनीषा पृथ्वीपाल जैस्वाल असे आहे. पीडित महिला तिच्या चुलत बहिणीसोबत कुरार भागातील एका घरात राहत होती. दरम्यान, ती अखिलेश कुमार प्यारेलाल गौतम नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली. प्रेम फुलले, दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, पीडितेसोबत लग्न करण्याआधीच त्याने तिच्या हत्येचा कट रचून तिची हत्या केली आहे.

Mumbai Crime
Mumbai Crime
author img

By

Published : Jul 30, 2022, 1:21 PM IST

Updated : Jul 30, 2022, 1:57 PM IST

मालाड - मुंबईच्या मालाड पूर्व कुरार गावातील प्रियकराने प्रेयसीची हत्या केली आहे. पोलिसांनी लगेच आरोपी प्रियकराला अटक केली असुन, त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये जवळपास 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. हा प्रेमसंबंधाचा प्रकार त्याच्या चुलत भावाला कळला, त्यानंतर आरोपीने प्रेयसीची हत्या केली आहे.

या घटनेत जीव गमावलेल्या प्रेयसीचे नाव मनीषा पृथ्वीपाल जैस्वाल असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या चुलत बहिणीसोबत कुरार भागातील एका घरात राहत होती. दरम्यान, ती अखिलेश कुमार प्यारेलाल गौतम नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली. प्रेम फुलले, दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मग काय, दोघेही एकमेकांना सतत भेटू देखील लागले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही लग्न करणार होते. मात्र, पीडितेसोबत लग्न करण्याआधीच त्याने तिच्या हत्येचा कट रचून तिची हत्या केली आहे.

Mumbai Crime

कुरार पोलिसांना माहिती दिली - मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्या चुलत भावावर प्रेम करत होती. ज्याच्यासोबत ती राहत होती. याची माहिती अखिलेश यांना मिळाली. अखिलेश हा पीडितेचा दुसरा प्रियकर होता. फोन कॉलवरून मिळालेल्या माहितीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रियकर अखिलेश गौतमला अटक केली आहे. अखिलेश आणि पीडिता दोघेही शेजारील गावातील रहिवासी असून ते एकमेकांना ओळखतात. पीडितेच्या मावशीचा मुलगा घरी पोहोचला, तेव्हा त्याला पीडित मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. या प्रकरणाची माहिती कुरार पोलिसांना देण्यात आली होती. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी हत्येच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आरोपींचा शोध सुरू करण्यात आला होता.

पोलिसांची 3 टीम तयार - आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी 3 वेगवेगळ्या टीम तयार केल्या होत्या. तिन्ही पथक तपासासाठी पाठवण्यात आली आहेत. दरम्यान, आरोपी मानखुर्द स्थानकात येत असून तेथून तो मुंबई सोडून पळून जाणार असल्याची माहिती एका पथकाला मिळाली होती. त्यानंतर कुरार पोलीस तेथे पोहोचले आणि आरोपीला पळून जाण्यापूर्वी पकडले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कुरार पोलीस करत आहेत.

हेही वाचा - Mumbai Crime : टीव्ही पाहण्याच्या नादात उंदीर मारण्यासाठी ठेवलेलं विषारी टोमॅटो खाल्लं; मुंबईतील महिलेचा मृत्यू

Last Updated : Jul 30, 2022, 1:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.