ETV Bharat / city

BMC Election 2022 : महापालिका आरक्षणाची अशी राबवली जाणार लॉटरी प्रक्रिया; वाचा सविस्तर

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या 31 मे ला आरक्षण लॉटरी काढली जाणार ( BMC Election 2022 Ward Reservation Lottery ) आहे. ही लॉटरी शाळेतील मुलांच्या हस्ते काढली जाणार आहे.

BMC
BMC
author img

By

Published : May 30, 2022, 6:16 PM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या 31 मे ला आरक्षण लॉटरी काढली जाणार आहे. ही लॉटरी शाळेतील मुलांच्या हस्ते काढली जाणार असून, आधी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती त्यानंतर महिला आरक्षण काढले जाणार आहे. उद्या काढण्यात येणाऱ्या आरक्षणावर 13 जूनला शिक्कामोर्तब होणार आहे. यामुळे उद्याच्या आरक्षण सोडतीकडे राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले ( BMC Election 2022 Ward Reservation Lottery ) आहे.

प्रभाग आरक्षण सोडत - मुंबई महानगरपालिकेचे 227 प्रभाग होते. लोकसंख्येत वाढ झाल्याने राज्य सरकारने 9 प्रभागांची वाढ करून 236 प्रभाग केले आहेत. प्रभाग रचना मंजूर झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक आयोगाने ओबीसी वगळता निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उद्या 31 मे ला सकाळी 11 वाजता बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात अनुसूचित जातीच्या 15, अनुसूचित जमातीच्या 2 आणि 50 टक्के म्हणजेच 118 महिला आरक्षित प्रभागांची लॉटरी काढली जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या निवडणूक विभागाकडून देण्यात आली.

अशी सोडत काढली जाणार - राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी, पालिका आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंग चहल यांच्या उपस्थितीत महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण लॉटरी काढली जाणार आहे. सुरुवातीला अनुसूचित जातीच्या 15, अनुसुचित जमातीच्या 2 प्रभागांची सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर त्यामधील महिला आरक्षित प्रभागांची सोडत काढली जाईल. शेवटी उर्वरित प्रभागांमधून 109 महिला आरक्षित प्रभागांची सोडत काढली जाणार आहे. आरक्षित प्रभागांच्या सोडतीनंतर त्यावर 6 जूनपर्यंत सूचना व हरकती मागवण्यात येणार आहेत. 13 जूनला अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांचे लक्ष - उद्या 31 मे रोजी प्रभाग आरक्षण सोडतीनंतर कोणत्या प्रभागातून कोणता उमेदवार द्यायचा याची चाचपणी राजकीय पक्षांकडून सुरू केली जाईल. त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवारही निवडणुकीच्या कामाला लागणार आहे. ही आरक्षण सोडत प्रभाग आरक्षित झाल्याने अनेकांना पुढील पाच वर्षे नगरसेवक पदापासून लांब ठेवणार आहे. यामुळे उद्याच्या आरक्षण सोडतीकडे राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

अनुसूचित जातीच्या प्रभागात वाढ नाही - भारतात 2001 आणि 2011 ला जनगणना झाली होती. या जनगणनेनुसार प्रभाग आणि आरक्षण ठरवले जाते. 2001 च्या जनगणनेनुसार मुंबईत 227 प्रभाग करण्यात आले. मात्र, 2011 च्या जनगणनेत या प्रभागात वाढ करण्यात आली नव्हती. त्याचवेळी 2001 मध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या पाच लाखांची नोंदवली गेली. यामुळे 11 प्रभाग आरक्षित ठेवण्यात आले होते. 2011 च्या जनगणनेवेळी अनुसूचित जातीची लोकसंख्या आठ लाख इतकी नोंदवली गेली. यामुळे अनुसूचित जातीच्या प्रभागांच्या संख्येत वाढ होऊन 15 प्रभाग आरक्षित केले गेले. तर अनुसूचित जमातीच्या आरक्षणातही वाढ न होता 2 प्रभाग आरक्षित आहेत.

अनारक्षित प्रभाग वाढले - 2011 च्या जनगणनेनुसार 2012 आणि 2017 च्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या. यावेळी अनुसूचित जातीच्या प्रभागांची संख्या वाढली. पण, अनारक्षित प्रभागांची संख्या वाढलेली नाही. अनारक्षित प्रभागांची संख्या वाढवण्याची गरज होती. मात्र, गेल्या दोन निवडणुकांमध्ये प्रभाग वाढवले नसल्याने त्यांची संख्या आहे तशीच राहिली. आता 2022 च्या निवडणुका होत असताना अनारक्षित प्रभागांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेऊन 9 प्रभागांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे प्रभाग वाढले तरी आरक्षणात वाढ झाली नसल्याची माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ऑक्टोंबरमध्ये निवडणुकीची शक्यता - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी येत्या 31 मे ला आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यावर सूचना व हरकती मागवून 13 जूनला आरक्षणावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. त्यानंतर मतदार याद्या 236 प्रभागानुसार तसेच बुथ नुसार बनवल्या जाणार आहेत. यासाठी सुमारे एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. ही प्रक्रिया पार पाडेपर्यंत ऑगस्ट महिना येईल. सप्टेंबर पर्यंत पावसाळा असल्याने सुरुवातीला निवडणूकीची तारीख जाहीर केली जाईल. 45 दिवस आचारसंहिता असेल त्यानंतर म्हणजेच ऑक्टोंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होऊ शकतील.

आरक्षित प्रभाग, महिला आरक्षण - पालिकेच्या एकूण 236 प्रभागांपैकी अनुसूचित जातीसाठी 15, अनुसूचित जमातीसाठी 2 तर महिलांसाठी 50 टक्के प्रभाग आरक्षित असणार आहेत. महिलांसाठी एकूण 118 प्रभाग आरक्षित असतील. त्यात अनुसूचित जाती महिलांसाठी 8, अनुसूचित जमाती महिलांसाठी 1 प्रभाग तर इतर महिलांसाठी 109 प्रभाग आरक्षित असतील.

असे असेल आरक्षण -
मुंबई महापालिका एकूण प्रभाग - 236
50 टक्के महिलांसाठी एकूण प्रभाग - 118
अनुसूचित जातीसाठी एकूण प्रभाग - 15
अनुसूचित जमातीसाठी एकूण प्रभाग - 2

महिला आरक्षण -
महिलांसाठी 50 टक्के राखीव - 118
खुला वर्ग महिलांसाठी - 109
अनुसूचित जाती महिलांसाठी - 8
अनुसूचित जमाती महिलांसाठी - 1

हेही वाचा - Rape Threat To Widow Women : 'विधवांचा सन्मान केल्यास त्यांच्यावर बलात्कार करू', निलम गोऱ्हेंच्या कार्यालयात आले धमकीचे पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.