ETV Bharat / city

Mumbai Corona Update : १९८ नवे रुग्ण, शून्य मृत्यूची नोंद

मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट ( The third wave of corona virus ) आटोक्यात आल्यामुळे रुग्णसंख्येत घट ( Decrease in patients ) होऊन गेले काही दिवस ५० आत व नंतर १०० वर रुग्ण आढळून येत होते. सलग दोन दिवस रुग्णसंख्या २०० च्या नोंदवली होती आज शनिवारी त्यात घट होऊन १९८ नव्या रुग्णांची तर शून्य मृत्यूची नोंद ( Deaths ) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून १ हजार २११ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 21, 2022, 8:39 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट ( The third wave of corona virus ) आटोक्यात आल्यामुळे रुग्णसंख्येत घट ( Decrease in patients ) होऊन गेले काही दिवस ५० आत व नंतर १०० वर रुग्ण आढळून येत होते. सलग दोन दिवस रुग्णसंख्या २०० च्या नोंदवली होती आज शनिवारी त्यात घट होऊन १९८ नव्या रुग्णांची तर शून्य मृत्यूची नोंद ( Deaths ) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून १ हजार २११ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

१९८ नवे रुग्ण - मुंबईत आज शनिवारी १९८ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज १३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६२ हजार ६७४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४१ हजार ८९७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१ हजार २११ सक्रिय रुग्ण - सध्या १ हजार २११ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४ हजार ४३३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१५ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या १९८ रुग्णांपैकी १९४ म्हणजेच ९८ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ५१० बेड्स असून त्यापैकी ४१ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्यांहून अधिक बेड रिक्त आहेत.

रुग्णसंख्या वाढतेय - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या पुन्हा १०० च्या वर गेली आहे. ३ मे रोजी १००, ४ मे ला ११७, ५ मे रोजी १३०, ६ मे ला ११७, ७ मे रोजी १७२, ८ मे रोजी १२३, ९ मे रोजी ६३, १० मे रोजी १२२, ११ मे रोजी १२४, १२ मे रोजी १३९, १३ मे रोजी १५५, १४ मे रोजी १३१, १५ मे रोजी १५१, १७ मे रोजी १५८, १८ मे रोजी १९४, १९ मे रोजी २२३, २० मे रोजी २१३, २१ मे रोजी १९८ रुग्णांची नोंद झाली आहे.

८९ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर, २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ८९ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा तर मे महिन्यात १८ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा - Hindutva : हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षाची चढाओढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.