मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यांपासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या ( Mumbai Corona Update ) वाढू लागली आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली ( New Corona Patients in Mumbai ) होती. ५ जानेवारीला दुसऱ्या लाटेचा रेकॉर्ड तोडत १५ हजार १६६ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात किंचित घसरण होऊन ९ जानेवारीला १९ हजार ४७४ तर १० जानेवारीला १३ हजार ६४८ रुग्णांची नोंद झाली होती. आज ११ जानेवारीला रुग्णसंख्येत आणखी घट होऊन ११ हजार ६४७ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या ( Active Corona Patients in Mumbai ) १ लाख ५२३ वर पोहोचली आहे.
११ हजार ६४७ नव्या रुग्णांची नोंद - मुंबईत आज (११ जानेवारी) ११ हजार ६४७ नवे रुग्ण आढळून ( New Corona Patients in Mumbai ) आले असून २ मृत्यूची नोंद झाली आहे. आज १४ हजार ९८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ९ लाख ३९ हजार ८६७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ८ लाख २० हजार ३१३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ४१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या ( Active Corona Patients in Mumbai ) १ लाख ५२३ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३६ दिवस इतका आहे. मुंबईमधील ६३ इमारती सील आहेत. ४ जानेवारी ते १० जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर १.८७ टक्के इतका आहे.
८० टक्के बेड रिक्त - मुंबईत आज आढळून आलेल्या रुग्णांपैकी ९ हजार ६६७ म्हणजेच ८३ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ८५१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ७६ रुग्णांना ऑक्सिजन बेडची ( Total Oxygen Beds in Mumbai ) आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३६ हजार ५७३ बेड्स असून त्यापैकी ७ हजार २८३ बेडवर म्हणजेच १९.९ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ८० टक्के बेड रिक्त ( Available Oxygen Beds in Mumbai ) आहेत.
अशी वाढली रुग्णसंख्या - मुंबईत फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारांवर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. १७ डिसेंबरला २९५, १९ डिसेंबरला ३३६, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२, २४ डिसेंबरला ६८३, २५ डिसेंबर ७५७, २६ डिसेंबर ९२२, २७ डिसेंबरला ८०९, २८ डिसेंबरला १ हजार ३७७, २९ डिसेंबरला २ हजार ५१०, ३० डिसेंबर ३ हजार ६७१, ३१ डिसेंबरला ५ हजार ६३१, १ जानेवारीला ६ हजार ३४७, २ जानेवारीला ८ हजार ६३, ३ जानेवारीला ८ हजार ८२, ४ जानेवारीला १० हजार ८६०, ५ जानेवारीला १५ हजार १६६, ६ जानेवारीला २० हजार १८१, ७ जानेवारीला २० हजार ९७१, ८ जानेवारीला २० हजार ३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटली असून ९ जानेवारीला १९ हजार ४७४, १० जानेवारीला १३ हजार ६४८, ११ जानेवारीला ११ हजार ६४७ नवीन रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत.
नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली ( Zero death records due to Corona ) आहे.
धारावीत ५१ रुग्ण -मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली ( Dharavi Corona Update ) आहे. धारावीत ३० डिसेंबरला २०, ३१ डिसेंबरला ३४, १ जानेवारीला २४, २ जानेवारीला ६०, ३ जानेवारीला ४१, ४ जानेवारीला ४०, ५ जानेवारीला ८१, ६ जानेवारीला १०७, ७ जानेवारीला १५०, ८ जानेवारीला १४७, ९ जानेवारीला १२३, १० जानेवारीला ९७, ११ जानेवारीला ५१ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत एकूण ८ हजार १९४ रुग्ण असून त्यापैकी ७ हजार २१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या ७५६ सक्रिय रुग्ण आहेत.
हेही वाचा - Arthur Road Jail : आर्थर रोड जेलमधील 27 कैद्यांना कोरोनाची लागण