मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी (९ जानेवारी) १९ हजार ४७४ रुग्णांची नोंद झाली ( Mumbai Corona Update ) आहे तर सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परदेशातून आलेला एक व मुंबईतील ३९, असे ४० रुग्ण ओमायक्रॉन रुग्ण ( Omicron Patients in Mumbai ) आढळले आहेत.
१ लाख १७ हजार ४३७ सक्रिय रुग्ण - मुंबईत आज १९ हजार ४७४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ७ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ८ हजार ६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ९ लाख १४ हजार ५७२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख ७८ हजार ११९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ४०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ४३७ वर पोहोचली ( Active Corona Patients in Mumbai ) आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४१ दिवस इतका आहे. मुंबईमधील १२३ इमारती आणि १७ झोपडपट्ट्या सील करण्यात आली आहे. २ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर १.६६ टक्के इतका आहे.
७८.७ टक्के बेड रिक्त - मुंबईत आज आढळून आलेल्या १९ हजार ४७४ रुग्णांपैकी १५ हजार ९६९ म्हणजेच ८२ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज १ हजार २४० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ११८ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३४ हजार ९६० बेड्स असून त्यापैकी ७ हजार ४३२ बेडवर म्हणजेच २१.३ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ७८.७ टक्के बेड रिक्त आहेत.
अशी वाढली रुग्णसंख्या - मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारांवर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. १७ डिसेंबरला २९५, १९ डिसेंबरला ३३६, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२, २४ डिसेंबरला ६८३, २५ डिसेंबर ७५७, २६ डिसेंबर ९२२, २७ डिसेंबरला ८०९, २८ डिसेंबरला १ हजार ३७७, २९ डिसेंबरला २ हजार ५१०, ३० डिसेंबर ३ हजार ६७१, ३१ डिसेंबरला ५ हजार ६३१, १ जानेवारीला ६ हजार ३४७, २ जानेवारीला ८ हजार ६३, ३ जानेवारीला ८ हजार ८२, ४ जानेवारीला १० हजार ८६०, ५ जानेवारीला १५ हजार १६६, ६ जानेवारीला २० हजार १८१, ७ जानेवारीला २० हजार ९७१, ८ जानेवारीला २० हजार ३१८, ९ जानेवारीला १९ हजार ४७४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
धारावीत १२३ रुग्ण - मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. धारावीत ३० डिसेंबरला २०, ३१ डिसेंबरला ३४, १ जानेवारीला २४, २ जानेवारीला ६०, ३ जानेवारीला ४१, ४ जानेवारीला ४०, ५ जानेवारीला ८१, ६ जानेवारीला १०७, ७ जानेवारीला १५०, ८ जानेवारीला १४७, ९ जानेवारीला १२३ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत एकूण ८०४६ रुग्ण असून ६७८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या ८४९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी २१३ रुग्णांना लक्षणे असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ६३६ लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आणि संस्थात्मक विलगिकरणात आहेत.
मुंबईत ओमायक्रॉनचे ४० रुग्ण - मुंबईत आज परदेश प्रवास केलेला १ तर मुंबईतील रहिवासी असलेले ३९, असे ४० रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह ( Omicron Patients in Mumbai ) आढळून आले आहेत. आतापर्यंत परदेश प्रवास करून मुंबई विमानतळावर आलेले ३०३ तर मुंबईमधील ३००, असे एकूण ६०३ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यापैकी ३०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हेही वाचा - पंतप्रधानांना कळते ते भाजप नेत्यांना कळत नाही, सोमैया भरसटलेले - महापौर पेडणेकरांचा टोला