मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट ( Third Wave Corona Virus ) आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट ( Mumbai Corona Cases ) होऊन गेले काही दिवस ५० च्या आत रुग्ण आढळून येत होते. त्यात वाढ होऊन १३ एप्रिलला ७३, १९ एप्रिलला ८५, २० एप्रिलला ९८ नव्या रुग्णांची नोंद झाली. आज ( 21 एप्रिल ) गुरुवारी त्यात किंचित घट होऊन ९१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, शून्य मृत्यूची नोंद ( Mumbai Corona Death ) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून, ४५० सक्रिय रुग्ण ( Mumbai Corona Active Case ) आहेत.
९१ नवे रुग्ण : मुंबईत ९१ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५९ हजार ०७३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३९ हजार ०६१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४५० सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के ( Mumbai Corona Recovery Rate ) तर रुग्ण दुपटीचा कालावधी १२,६५९ दिवस इतका ( Mumbai Corona Doubling Rate ) आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००५ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ९१ रुग्णांपैकी ९० म्हणजेच ९९ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार ०४४ बेड्स असून, त्यापैकी १२ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्के बेड रिक्त आहेत.
रुग्णसंख्येत वाढ : मुंबईत पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८००, तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून, ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २४ मार्चला ५४, ३१ मार्चला ४२, १ एप्रिलला ३२, २ एप्रिलला ४९, ३ एप्रिलला ३५, ४ एप्रिलला १८, ५ एप्रिलला ५६, ६ एप्रिलला ५१, ७ एप्रिलला ४१, ८ एप्रिलला ४९, ९ एप्रिलला ५५, १० एप्रिलला ३५, ११ एप्रिलला २६, १२ एप्रिलला ५२,१३ एप्रिलला ७३, १४ एप्रिलला ५६, १५ एप्रिलला ४४, १६ एप्रिलला ४३, १७ एप्रिलला ५५, १८ एप्रिलला ३४, १९ एप्रिलला ८५, २० एप्रिलला ९८, २१ एप्रिलला ९१ रुग्णांची नोंद झाली आहे.
६३ वेळा शून्य मृत्यूची नोंद : मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ६३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा तर एप्रिल महिन्यात १८ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा - Load shading in Maharashtra : जयंत पाटलांच्या कोल्हापूरच्या कार्यक्रमात चार ते पाच वेळा वीजपुरवठा खंडित; उर्जामंत्र्यांचा दावा फोल