मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट ( Third Wave Of Corona Virus) आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट होऊन गेले काही दिवस ५० च्या आत रुग्ण आढळून येत होते. त्यात वाढ होऊन १३ एप्रिलला ७३, १९ एप्रिलला ८५, २० एप्रिलला ९८, २१ एप्रिलला ९१ नव्या रुग्णांची नोंद झाली. आज शनिवारी ( 23 एप्रिल ) ७२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद ( Mumbai Corona Death ) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून, ५०३ सक्रिय रुग्ण ( Mumbai Corona Cases ) आहेत.
७२ नवे रुग्ण - मुंबईत शनिवारी ७२ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर, शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात ( Mumbai Corona Discharge ) आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५९ हजार २१३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३९ हजार १४८ रुग्ण बरे झाले आहेत. तर, १९ हजार ५६२ रुग्णांचा मृत्यू झाला ( Mumbai Corona Death ) आहे. सध्या ५०३ सक्रिय रुग्ण ( Mumbai Corona Cases ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १०,७३६ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातील कोरोना वाढीचा दर ०.००६ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ७२ रुग्णांपैकी ७० म्हणजेच ९७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २५ हजार ९४४ बेड्स असून, त्यापैकी १२ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्यांहून अधिक बेड रिक्त आहेत.
रुग्णसंख्या वाढतेय - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटेदरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २४ मार्चला ५४, ३१ मार्चला ४२, १ एप्रिलला ३२, २ एप्रिलला ४९, ३ एप्रिलला ३५, ४ एप्रिलला १८, ५ एप्रिलला ५६, ६ एप्रिलला ५१, ७ एप्रिलला ४१, ८ एप्रिलला ४९, ९ एप्रिलला ५५, १० एप्रिलला ३५, ११ एप्रिलला २६, १२ एप्रिलला ५२,१३ एप्रिलला ७३, १४ एप्रिलला ५६, १५ एप्रिलला ४४, १६ एप्रिलला ४३, १७ एप्रिलला ५५, १८ एप्रिलला ३४, १९ एप्रिलला ८५, २० एप्रिलला ९८, २१ एप्रिलला ९१, २२ एप्रिलला ६८, २३ एप्रिलला ७२ रुग्णांची नोंद झाली आहे.
६५ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ६५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा तर एप्रिल महिन्यात २० वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा - Rana Couple Vs Shiv Sena : राणा दाम्पत्याला अखेर अटक; सकाळपासून मुंबईत रंगले आंदोलन, प्रतिआंदोलनाचे नाटक