मुंबई - मुंबईत मार्च 2020 पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या दहा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. आज (रविवारी) मुंबईत कोरोनाचे 483 नवे रुग्ण आढळून आले असून 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
कोरोना रुग्णांची आकडेवारी -
मुंबईत आज 483 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 8 हजार 969 वर पोहचला आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 351 वर पोहचला आहे. 244 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 90 हजार 913 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 5797 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 559 दिवस -
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 559 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 199 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 2 हजार 086 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 28 लाख 04 हजार 281 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
या दिवशी कमी रुग्णांची नोंद -
मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348 तर 26 जानेवारीला 342 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा- ठाणे: कोरोनात वीरमरण आलेल्या योद्ध्यांच्या वारसांना पोलीस सेवेत संधी