मुंबई - मुंबईत आज (दि. 16 ) पुन्हा कोरोनाचे 279 नवे रुग्ण ( Mumbai Corona Update ) आढळून आले आहेत. तर 2 मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 7 लाख 66 हजार 213 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 45 हजार 401 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 362 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 873 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 2572 दिवस इतका आहे. मुंबईमधील 18 इमारती सील करण्यात आल्या आहेत. 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.03 टक्के इतका आहे.
'या' दिवशी रुग्णसंख्या 200 च्या वर -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 228 रुग्ण आढळून आले. 4 डिसेंबरला पुन्हा वाढ होऊन 228, 5 डिसेंबरला 219, 8 डिसेंबरला 250, 9 डिसेंबरला 218, 11 डिसेंबरला 256, 14 डिसेंबरला 225, 15 डिसेंबरला 238, 16 डिसेंबरला 279 रुग्ण आढळून आले आहेत.
तीन वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. मुंबईमध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. त्याच प्रमाणे मृत्यूंची संख्या कमी करण्यात यश आले आहे. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात 1 ते 6 मृत्यूंची नोंद होत होती. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला शून्य रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर 15 डिसेंबरला तिसऱ्यांदा शुन्य रुग्णांची नोंद झाली आहे. मृत्यू संख्या शून्य होत असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.
हे ही वाचा - Omicron Variant Updates : राज्यात आज ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण नाही, तर 877 नवे कोरोना बाधित