ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या घटली, आज ३६७ नव्या रुग्णांची नोंद, एका रुग्णाचा मृत्यू - मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या घटली

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली ( Corona Patients Decreased In Mumbai ) आहे. आज मुंबईमध्ये ३६७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली ( New Covid Patients In Mumbai ) असून, अवघ्या एका रुग्णाचा मृत्यू झाला ( Covid Deaths In Mumbai ) आहे.

मुंबई कोरोना अपडेट
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Feb 11, 2022, 7:44 PM IST

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली आहे ( Corona's Third Wave in Mumbai ). जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत ( Corona Patients Decreased In Mumbai ) आहे. सोमवारी ३६५ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात सलग ३ दिवस ४०० च्या वर रुग्ण आढळून आले. आज शुक्रवारी किंचित घट होऊन ३६७ रुग्णांची नोंद झाली ( New Covid Patients In Mumbai ) आहे. आज १ मृत्यूची नोंद करण्यात आली ( Covid Deaths In Mumbai ) आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के तर, ३३१९ सक्रिय रुग्ण आहेत.

३६७ नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटेदरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून, ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (११ फेब्रुवारीला) ३६७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ८४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५३ हजार ४१३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३० हजार ६६९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३२१९ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १०५५ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. ४ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०७ टक्के इतका आहे.

९६.८ टक्के बेड रिक्त

मुंबईत आज आढळून आलेल्या ३६७ रुग्णांपैकी ३१६ म्हणजेच ८६ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ५० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. १४ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३६,९६६ बेडस असून त्यापैकी ११६२ बेडवर म्हणजेच ३.१ टक्के बेडव रुग्ण आहेत. इतर ९६.९ टक्के बेड रिक्त आहेत.

रुग्णसंख्या घटतेय

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात वाढ हाऊ लागली. ६ जानेवारीला २०,१८१, ७ जानेवारीला २०,९७१, ८ जानेवारीला २०,३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटली असून २४ जानेवारीला १८५७, २५ जानेवारीला १८१५, २६ जानेवारीला १८५८ रुग्ण आढळून आले. त्यानंतर त्यात आणखी घट होऊन ३१ जानेवारीला ९६०, १ फेब्रुवारीला ८०३, २ फेब्रुवारीला ११२८, ३ फेब्रुवारीला ८२७, ४ फेब्रुवारीला ८४६, ५ फेब्रुवारीला ६४३, ६ फेब्रुवारीला ५३६, ७ फेब्रुबारीला ३५६, ८ फेब्रुवारीला ४४७, ९ फेब्रुवारीला ४४१, १० फेब्रुवारीला ४२९, ११ फेब्रुवारीला ३६७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद

मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.