ETV Bharat / city

CNG price reduce सीएनजी सहा रुपये तर पीएनजी चार रुपयाने होणार स्वस्त - महानगर गॅस लिमिटेड

CNG price reduce महानगर गॅस लिमिटेडने MGL सीएनजीच्या CNG Price Hike दरात सहा रुपयांची तर पीएनजीच्या PNG दरात चार रुपयांची घट केली असून नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील

CNG price reduce
CNG price reduce
author img

By

Published : Aug 17, 2022, 6:49 AM IST

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने Mahanagar Gas Limited आज मध्यरात्रीपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस CNG ची किंमत प्रति किलो 6 रुपये आणि घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस PNG ची किंमत 4 रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे सीएनजीच्या सर्व करांसह सुधारित किंमत 80 रुपये प्रति किलो असणार आहे, आणि पीएनजी गॅसची किंमत 48.50 रुपये प्रति युनिट असणार आहे. त्यामुळे सीएनजी गाड्या वापरणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

सीएनजी 6 रुपयांनी स्वस्त पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या वाटपातील वाढीव सुधारणेच्या परिणामी, महानगर गॅस लिमिटेड MGL त्याच्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस CNG च्या किंमतीत रु. 6.00 आणि घरगुती पाइप्ड नॅचरल गॅसच्या किंमती कमी केल्या आहेत. 16 ऑगस्ट 2022 मध्यरात्री ते 17 ऑगस्ट 2022 सकाळपासून मुंबईत आणि आसपासच्या परिसरात दर लागू होईल. त्यानुसार, CNG च्या सर्व करांसह सुधारित किंमत 80 रुपये किलो आणि देशांतर्गत पीएनजी किंमत 48.50 मुंबई आणि आसपासच्या शहरात असेल,” असे महानगर गॅस लिमिटेडने जाहीर केले आहे.

या आधी वाढलेल्या किमती या आधी मुंबईमध्ये सीएनजीचे दर 2 ऑगस्ट रोजी वाढले. त्यावेळी सीएनजीच्या दरात सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याआधी सीएनजीचे दर 12 जुलै रोजी वाढले होते. त्यावेळी सीएनजीच्या दरात 4 रुपयांची वाढ तर पीएनजीच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यापूर्वी 29 एप्रिल रोजी सीएनजीच्या दरात चार रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

नागपुरात पेट्रोल आणि डिझेलपेक्षाही सीएनजी महाग इंधनदरातील वाढीमुळे नागरिक त्रस्त असताना CNG चा पर्याय वाहनधारकांसाठी होता. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इंधनाचा स्वस्त पर्याय म्हणून CNG कडे पाहिले जात होतं. मात्र CNG च्या दरांतही झपाट्यानं होणारी वाढ नागरिकांची चिंता वाढवत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच पेट्रोल डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा सल्ला नागरिकांना देत असतात. मात्र गडकरींच्याच शहरात सीएनजीच्या दराचा भडका उडाला आहे. कारण नागपुरात सीएनजी पेट्रोल-डिझेलपेक्षाही महाग विकलं जात आहे. शहरात मोजकेच CNG चे विक्रेते असून विदर्भातील इतर जिल्ह्यांपेक्षाही महाग CNG नागपूरात विकलं जात आहे. नागपूरमध्ये CNG चा दर हा 116 रुपये प्रति किलो आहे. तर पेट्रोलचा दर हा 106 रुपये 5 पैसे आणि डिझेलचे दर 92 रुपये 60 पैसे आहे.

हेही वाचा - Monsoon Session 2022 हे सरकार असंविधानिक असल्याने त्यांच्या चहापानाला कशाला जायचे -दानवे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.