मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. धावत्या लोकल ट्रेनच्या महिला डब्यात एका तरुणीवर धारदार ब्लेडने हल्ला केला ( Thief Attack Woman Blade ) आहे. चर्नी रोड रेल्वे स्थानकावर ही घटना ( Charni Road Station ) घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षता नागरे असे या हल्ला झालेल्या तरुणीचे नाव आहे. अक्षताने शुक्रवारी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास वांद्रे स्थानकावरून चर्चगेटला जाणारी लोकल ट्रेन पकडली. अक्षता महिला डब्यातून प्रवास करत होती. यादरम्यान, लोकल चर्नी रोड रेल्वे स्थानकांवर थांबली. तेव्हा एक सोनसाखळी चोर महिला डब्यात चढला आणि अक्षताच्या गळातील सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा तिने प्रतिकार करत या चोरट्याला हुसकावून लावले. चोराच्या हातात सोनसाखळी लागली नाही. मात्र, तिच्या गळाला मोठी दुखापत झाली आहेत. हल्ला झाल्यानंतर या प्रकरणी चर्चगेट लोहमार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्याच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईकरांचा लोकलचा प्रवास दिवसेंदिवस असुरक्षित होत चालला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे स्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. तरी सुद्धा रेल्वे स्थानकात घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये काही घट होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे महिला डब्यात सुरक्षा रक्षक नसल्याने ही घटना घडली असल्याचे बोलण्यात येत आहे. त्यामुळे महिला डब्यात सुरक्षा रक्षक ठेवण्याची मागणी आता पुन्हा एकदा समोर आली आहे.
हेही वाचा - Jayant Patil On Central Investigation Agency : केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई संशयास्पद - जयंत पाटील