ETV Bharat / city

Chhota Shakeel : छोटा शकीलच्या नावाने व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी, तिघांविरोधात गुन्हा दाखल

मुंबईतील डोंगरी परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कुख्यात गुंड छोटा शकीलच्या नावाने एका व्यावसायिकास 5 कोटी रुपये रक्कम आणि जमिनीचा 50 टक्के हिस्सा मागत धमकावल्याचा प्रकार डोंगरी ( Mumbai businessman extortion in name of Chhota Shakeel police case in dongari ) येथे घडला आहे. या प्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात छोटा शकीलसह त्याचा मेहुणा आरिफ भाईजान आणि बांधकाम व्यावसायिक जयेश शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai businessman extortion in name of Chhota Shakeel police case in dongari
छोटा शकीलच्या नावाने व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी, तिघांविरोधात गुन्हा दाखल
author img

By

Published : Oct 11, 2022, 9:42 AM IST

Updated : Oct 11, 2022, 2:49 PM IST

मुंबई : मुंबईतील डोंगरी परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कुख्यात गुंड छोटा शकीलच्या नावाने एका व्यावसायिकास 5 कोटी रुपये रक्कम आणि जमिनीचा 50 टक्के हिस्सा मागत धमकावल्याचा प्रकार डोंगरी येथे घडला आहे. या प्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात छोटा शकीलसह त्याचा मेहुणा आरिफ भाईजान आणि बांधकाम व्यावसायिक जयेश शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल ( Mumbai businessman extortion in name of Chhota Shakeel police case in dongari ) करण्यात आला आहे.

Mumbai businessman extortion in name of Chhota Shakeel
कुख्यात गुंड छोटा शकीलच्या नावाने एका व्यावसायिकास 5 कोटी रुपये रक्कम आणि जमिनीचा 50 टक्के हिस्सा मागत धमकावल्याचा प्रकार डोंगरी येथे घडला आहे.

खरेदी-गुंतवणूकीचा व्यवसाय - डोंगरीतील 45 वर्षीय तक्रारदार व्यावसायिकाचे चोर बाजार येथे भागीदारीत जुन्या वस्तू विकण्याचे दुकान आहे. जुन्या पुरातन वस्तूंच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांतून त्यांनी 2006-07 पासून जमिनी आणि इमारतींच्या खरेदी-विक्रीत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. ऑगस्ट 2012 मध्ये त्यांनी मिरा रोड, नवघर परिसरात साडे पाच एकर जमीन चार कोटी रुपयांना विकत घेतली होती.

आरिफ छोटा शकीलचा मेहुणा - जमिनिच्या व्यवहारानंतर मूळ मालकांनी जयेश शहा व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत काही कागदोपत्री व्यवहार केल्याबाबत समजले. त्यामुळे त्यांनी शहा यांच्याशी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न न झाल्याने त्यांनी जमीन विकण्याचा निश्चय केला. 2018 मध्ये मीरा रोडमधील इस्टेट एजंट श्याम ओझा याने आरिफ भाईजानशी भेट घालून दिली. आरिफ छोटा शकीलचा मेहुणा असल्याचे समजताच ते घाबरले होते.

छोटा शकीलच्या नावाने धमकी - आरिफने जमिनीचे कागदपत्र घेऊन पुन्हा बोलावून वाद मिटविण्यासाठी जयेश शहा यांना 5 कोटी रक्कम आणि 50 हजार चाैरस फूट जागा देण्यास सांगितले. व्यावसायिक जयेश शहा यांनी नकार दिल्याने छोटा शकीलच्या नावाने त्यास धमकाविले. एनआयएने आरिफला अटक केल्यानंतर तक्रारदारांनी डोंगरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Last Updated : Oct 11, 2022, 2:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.