ETV Bharat / city

Mumbai BEST Bus : बेस्टचे तिकीट पास पेपरलेस, आता ॲपवर दिसणार तिकीट

author img

By

Published : Feb 10, 2022, 4:20 AM IST

मुंबईकरांची लाईफलाईन असलेला बेस्ट उपक्रम ( Mumbai Best Bus ) डिजिटल होत आहे. याचाच एक भाग म्हणून नुकतेच चलो ॲपचे ( Chalo App By BEST ) लोकार्पण करण्यात आले. या ॲपला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

Mumbai BEST Bus
Mumbai BEST Bus

मुंबई - मुंबईकरांची लाईफलाईन असलेला बेस्ट उपक्रम ( Mumbai Best Bus ) डिजिटल होत आहे. याचाच एक भाग म्हणून नुकतेच चलो ॲपचे ( Chalo App By BEST ) लोकार्पण करण्यात आले. बेस्टमध्ये गेल्या काही महिन्यात प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, आता चलो ॲपवरुन वाहकाला पैसे दिल्यास मोबाईलवरच तिकिट दिसणार आहे. तसेच पास दाखवल्यावर ही मोबाईलवर तिकीट दिसणार आहे. यामुळे गर्दीच्यावेळी कंडक्टर आणि प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

कागदी तिकीट होणार बंद -

मुंबईमध्ये रेल्वे आणि बेस्ट या सार्वजनिक उपक्रमाद्वारे परिवहन सेवा दिली जाते. दोन वर्षापूर्वी कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यावर रेल्वे सेवा बंद करण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना नियोजित स्थळी पोहचवण्याचे काम बेस्टने केले. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर सामान्य प्रवाशांना बेस्टने प्रवास करण्याची मुभा दिल्यावर प्रवाशांची संख्या वाढली. प्रवाशांची संख्या वाढू लागताच बेस्टने चलो ॲप सुरु केले. या ॲपला सलग्न असलेल्या मोबाईल वॉलेटमधून अथवा कार्डमधून पैसे अदा करुन तिकीट घेता येते. आतापर्यंत हे तिकीट दाखवल्यावर प्रवाशांच्या विनंतीवर वाहक प्रवाशांना कागदी तिकीट देत होते. त्याच बरोबर या ॲपलिकेशनबरोबर पासही जोडला असणार आहे. हा पास दाखवल्यावर वाहकांकडून शून्य रुपयांचे तिकीट दिले जात होते. मात्र, १४ फेब्रुवारीपासून ही पध्दत बंद होणार असून ऑनलाईन तिकीट काढणाऱ्यांना पूर्वीप्रमाणे कागदी तिकीट देणे बंद करण्यात येणार आहे, असे बेस्ट उपक्रमाकडून कळविण्यात आले आहे.

पेपरलेस तिकीट -

प्रवासाचे तिकीट अथवा पास सक्रीय केल्यानंतर प्रवासादरम्यान मोबाईल ॲपवरील तिकीट पास गाडीमधील अथवा बसथांब्यावरील कार्यरत वसवाहकाला दाखविणे आवश्यक आहे. बसवाहकाने त्याच्याकडील तिकीट वितरण मशिनच्या माध्यमातून या तपशीलाची नोंद घेतल्यानंतर बसपास, तिकीट प्रवासाकरीता वैध ठरेल. सद्यस्थितीत बसवाहक प्रवाशांच्या आग्रहावरुन प्रत्यक्ष कागदी तिकीटाचे वितरण करतात. ती पध्दत आता बंद करण्यात येणार आहे. प्रवाशांनी प्रवासादरम्यान तपासणीकरीता बसनिरीक्षक अथवा अन्य पर्यवेक्षकीय कर्मचारी अधिकारी यांनी मागणी केल्यास आपल्या मोबाईल स्क्रिनवरील तिकीट बसपासचा तपशील तपासणीसांना दाखविल्यास ते ग्राहय धरण्यात येईल, असेही बेस्टने स्पष्ट केले आहे.

ॲपला चांगला प्रतिसाद -

बेस्टच्या चलो ॲपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेस्टमधून सरासरी २४ लाखहून अधिक प्रवासी राेज प्रवास करतात. त्यातील ५ लाख २५ हजार प्रवाशांनी चलो ॲपचे डाऊनलोड केले आहे. त्यातील १ लाख ५० हजार प्रवासी चलो ॲप व स्मार्ट कार्डद्वारे बेस्ट तिकीट पास घेऊन बसमध्ये प्रवास करतात.

हेही वाचा - Maharashtra Unlock : आरोग्य मंत्री टोपे म्हणाले - 'या' महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र अनलॉक होण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.