मुंबई - रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) यांच्या वतीने मुंबई ते अहमदाबाद चालविण्यात येणारी खासगी तेजस एक्सप्रेस ७ ऑगस्ट २०२१ पासून सुरु केली होती. तेव्हा ट्रेन क्रमांक 82902 / 82901अहमदाबाद - मुंबई सेंट्रल तेजस एक्स्प्रेस शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे आठवड्यातील चार दिवस धावत होती. मात्र, आता प्रवाशांचा वाढता प्रतिसाद बघता आयआरसीटीसीने आठवड्यातून पाच दिवस तेजस एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बुधवारी सुद्धा धावणार तेजस एक्सप्रेस -
कोरोनाच्या पार्श्वभूवीर देशात धावणार्या आयआरसीटीसीच्या तिन्ही खासगी ट्रेन सुद्धा रद्द करण्यात आलेल्या होत्या. ज्यात मुंबई- अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस, दिल्ली-लखनऊ तेजस एक्स्प्रेस आणि काशी महाकाल एक्स्प्रेसचा समावेश आहे. पण अनलॉकची सुरुवात होताच मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी खासगी तेजस एक्सप्रेस 17 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली होती. मात्र प्रवासी मिळत नसल्यामुळे पुन्हा एकदा खासगी तेजस बंद करण्यात आली होती. त्यानंतर 14 फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे निमित्त मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस सुरू केली होती. मात्र, मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आल्याने खबरदारी म्हणून मुंबईसह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लावण्यात आलेला होता. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसची प्रवासी संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी ट्रेन क्रमांक 82901 / 82902 मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नंतर तेजस एक्सप्रेस ७ ऑगस्ट २०२१ पासून सुरु केली होती. तेव्हा अहमदाबाद - मुंबई सेंट्रल तेजस एक्स्प्रेस शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे आठवड्यातील चार दिवस धावत होती. मात्र, आता शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार आणि बुधवारीही तेजस एक्स्प्रेस धावणार आहे.
कोविड नियमांची अंमलबजावणी -
प्रवाशांचा वाढता प्रतिसादा बघता ट्रेन क्रमांक 82901 / 82902 मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस आता २२ डिसेंबर २०२१ पासून आठवड्यातील पाच दिवस चालविण्याचा निर्णय इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशने घेतला आहे. तसेच भविष्यात प्रवाशांच्या मागणीनुसार, या गाडीला नियमित चालविण्याचा निर्णय घेणार आहे. तसेच तेजस एक्स्प्रेसमध्ये शासनाने आखून दिलेल्या कोविड नियम पाळले जाणार आहेत. विशेष म्हणजे तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवास करण्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग केली जात आहे. याशिवाय तेजस एक्स्प्रेसच्या स्वच्छालय आणि रेल्वे डब्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याची माहिती आयआरसीटीसीचे महाव्यवस्थापक राहुल हिमालीयन यांनी दिली आहे.