ETV Bharat / city

महिलांवरील अत्याचारांविरोधात 'आप'चे अन्नत्याग आंदोलन; आझाद मैदानावर कार्यकर्ते आक्रमक - aam adami on hunger strike in mumbai

रखडलेल्या शिक्षांचा तत्काळ निकाल लागावा यासाठी आम आदमी पक्षातर्फे आझाद मैदान येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले आहे.

aam aadami party on hunger strike; demands for women protection
महिलांवरील अत्याचारांविरोधात 'आप'चे अन्नत्याग आंदोलन; आझाद मैदानावर कार्यकर्ते आक्रमक
author img

By

Published : Dec 12, 2019, 7:20 PM IST

Updated : Dec 12, 2019, 8:07 PM IST

मुंबई - हैदराबादमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येने संपूर्ण देशात खळबळ झाली होती. परंतु, अद्याप महिलांवरील अत्याचाराची कित्येक प्रकरणे प्रलंबित असल्याचे उघड झाले आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

महिलांवरील अत्याचारांविरोधात 'आप'चे अन्नत्याग आंदोलन; आझाद मैदानावर कार्यकर्ते आक्रमक

रखडलेल्या शिक्षांचा तत्काळ निकाल लागावा यासाठी आम आदमी पक्षातर्फे आझाद मैदान येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले आहे.

महिलांवर होणारे अत्याचार तसेच पोलीस तपासात होणारा विलंब हे घटक तितकेच जबाबदार असल्याचे यावेळी आपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी अशा प्रकारचे सर्व खटले जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासाठी पक्षाच्या महिला कार्यकर्त्या आझाद मैदानावार अन्नत्याग करत आंदोलनाला बसल्या आहेत.

याच मागण्यांसोबत संसदेतील बलात्काराचे आरोप असणाऱ्या लोकप्रतिनिधींना निलंबीत करण्यात यावे, महिलांसाठी सार्वजनिक सडक सुरक्षेचा विचार व्हावा अशा विविध मागण्या घेऊन या कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. महिलांवर अत्याचार केलेल्या आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम आदमी पक्षाच्या महिला आयोग अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहे. सध्या त्यांची प्रकृती खालावली आहे. तरीही सरकारला जाग येत नसल्याने हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी आम्ही राज्यात प्रत्येक ठिकाणी आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सरकार आम्हाला शाश्वती देत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेऊ, असे आपच्या महाराष्ट्र महिला पदाधिकारी अ‌ॅड. सुमित्रा श्रीवास्तव यांनी सांगितले.

Intro:हैदराबाद मध्ये युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि तिच्या हत्तीने पूर्ण देश हादरून गेला होता पण हैदराबाद पोलीसांकडून आरोपीचा खात्मा करण्यात आल्याने लोकांचा संताप काही प्रमाणात तरी शमला आहे पण देशभरातील बलात्काराची प्रकरणे अद्याप थांबलेली नाहीत हैदराबाद नंतर बलात्काराची कित्येक प्रकरणे अजून प्रलंबित असल्याचे उघड झाले आहे . यामुळे महिलांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आणि बलात्कारातील आरोपींवर त्वरित कारवाई व्हावी यासाठी आम आदमी पक्षातर्फे आझाद मैदान येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले आहे.

महिलांवर होणारे अन्याय आहे त्यामध्ये पोलीस तपासात होणारा विलंब देखील तितकाच जबाबदार असून महिलांवरील अत्याचार राष्ट्रीय समस्या झाली असून मानवी हक्क संरक्षण आज काही बाबतीत अतिरिक्त प्राधान्य देण्यात आल्यामुळे न्यायालयाच्या उदारमतवादी दृष्टिकोनच त्यास कारणीभूत असल्याचे आपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या वेळी म्हणत.. . बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी अशा प्रकारचे सर्व खटले जलदगती न्यायालयात चालवले जावेत ....सुरक्षा यंत्रणा मजबूत करावी.... शिक्षेच्या स्वरूपात बदल करावा ...अमली पदार्थाचा वापर विक्रीवर बंदी आणावी... तसेच आमदार व मंत्र्यांना जे सुरक्षाकवच पुरवले गेलेले आहेत ते काढून महिलांना पुरवावे.... संसदेत ज्यांच्यावर बलात्काराचा आरोप आणि खटले आहेत त्यांना निलंबित करावे... शाळा महाविद्यालय परिसरात विना वरती पोलीस असावेत... महिलांसाठी सार्वजनिक जागा तसेच सडक सुरक्षेचा विचार व्हावा... पीडित महिलांना नुकसानभरपाई दिली जावी... महिलांकडे पाहण्याचा मानसिकतेचा बदल व्हावा अशा विविध मागण्या घेऊन सरकारकडे आम आदमी पक्षाच्या महिला कार्यकर्त्या आजाद मैदान येथे अन्नत्याग करत आंदोलनाला बसल्या आहेत

महिलांच्या सुरक्षेचे साठी आणि बलात्कारातील आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम आदमी पक्षाच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अन्न त्याग करत आंदोलन करत आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. तरीही सरकारला जाग येत नाही त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी आम्ही राज्यात प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन करत आहोत. ते संविधानाच्या चौकटीत करत आहोत. त्यामुळे लवकर महिलांना न्याय मिळावा व चांगली सुरक्षा मिळावी यासाठी जोपर्यंत सरकार आम्हाला शास्वती देत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेऊ असे आपच्या महाराष्ट्र महिला पदाधिकारी ऍड सुमित्रा श्रीवास्तव यांनी सांगितले.

Body:.

Conclusion:.
Last Updated : Dec 12, 2019, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.