ETV Bharat / city

MPSC exam Postponed : एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलली, 'हे' आहे कारण - एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलली

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांची शेवटची संधी हुकली. त्यामुळे, वय मर्यादा ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना एक संधी मिळावी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 2 जानेवारी 2022 ला होणारी पूर्व परीक्षा ( MPSC pre exam postponed ) पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेला आहे.

MPSC
एमपीएससी
author img

By

Published : Dec 28, 2021, 10:40 PM IST

मुंबई - कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांची शेवटची संधी हुकली. त्यामुळे, वय मर्यादा ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना एक संधी मिळावी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 2 जानेवारी 2022 ला होणारी पूर्व परीक्षा ( MPSC pre exam postponed ) पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेला आहे. लवकरच नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - मुंबईत 31 डिसेंबरला गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसांसह पालिकेचाही असणार वॉच; नियम तोडल्यास होणार कारवाई

हे आहे कारण -

गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे शासकीय सेवेतील भरती प्रक्रिया रखडली होती. याचबरोबर शासकीय सेवेसाठी परीक्षा सुद्धा होऊ शकल्या नाहीत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने परीक्षा घेण्याचे ठरविले होते. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षा 2021 अंतर्गत 390 पदांसाठी परीक्षा घेण्याचे निश्चित केले होते. पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 ला घेण्याचे ठरले होते. या परीक्षेला 2 लाख 51 हजार 589 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होते. मात्र, या परीक्षेत अनेक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे. त्यामुळे, अशा उमेदवारांना एक संधी मिळावी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

या पदासाठी होणार होती परीक्षा -

उपजिल्हाधिकारी 12, पोलीस उपअधीक्षक 16, सहकार राज्य कर आयुक्त 16, गटविकास अधिकारी 15, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट - अ 15, उद्योग उप संचालक 4, सहाय्यक कामगार आयुक्त 22, उपशिक्षणाधिकारी 25, कक्ष अधिकारी 39, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4, सहाय्यक गटविकास अधिकारी 17, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था 18, उपअधीक्षक भूमी अभिलेख 15 , उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क 1, सहकारी कामगार अधिकारी 54, मुख्याधिकारी गट ब 75, मुख्याधिकारी गट अ 15 पदे, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ 10 अशा 290 पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेला आहे. लवकरच नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - No Election Assembly Speaker : अखेर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.