ETV Bharat / city

खासदार, आमदार, नगरसेवकांनी एका महिन्याचे मानधन महापौर निधीला द्यावे; महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे आवाहन

author img

By

Published : Aug 20, 2019, 6:07 AM IST

रुग्णांना देण्यात येणाऱ्या ५ हजार रुपयांच्या मदतीत वाढ करून १५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्रदय शस्त्रक्रिया तसेच किडणी रोपण या आजारांच्‍या रुग्‍णांना प्रत्‍येकी २५ हजार, डायलेसीसच्‍या रुग्णांकरीता १५ हजार रुपये आर्थिक मदत करण्‍याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.

विश्वनाथ महाडेश्वर

मुंबई- गरीब आणि गरजू रुग्णांना महापौर निधीमधून आर्थिक मदत केली जाते. रुग्णांना देण्यात येणाऱ्या मदत निधीमध्ये मागील महिन्यात वाढ करण्यात आली. मदत निधीमध्ये वाढ केल्यावर महापौर निधीमध्ये वाढ करता यावी म्हणून सोमवारी महापौरांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुंबईमधील खासदार, आमदार, नगरसेवक यांनी आपले एका महिन्याचे मानधन द्यावे तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचा पगार द्यावा असे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले आहे. मुंबईमधील उद्योगपतींकडूनही महापौर निधीसाठी मदत मागतील जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.

विश्वनाथ महाडेश्वर

महापौर निधीमधून २०११ पासून प्रत्येक गरजू रुग्णाला ५ हजार रुपये इतकी मदत केली जात होती. महापौर निधी समितीची बैठक होत नसल्याने व महापौर निधीमध्ये वाढ होत नसल्याने या निधीमध्ये गेल्या आठ वर्षात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नव्हती. महापौर निधीमधून आर्थिक मदत मिळेल या अपेक्षेने मुंबईकर मोठ्या प्रमाणात महापौरांकडे अर्ज करतात. मात्र निधी नसल्याने गरजू रुग्णांना जास्त रक्कम देता येत नव्हती. महापौर निधीमधून देण्यात आलेले ५ हजार रुपयांचे धनादेश अनेक रुग्णालये स्वीकारत नव्हती. यामुळे महापौर मदत निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मागील महिन्यात महापौर निधीबाबत बैठक घेण्यात आली. त्यात रुग्णांना देण्यात येणाऱ्या ५ हजार रुपयांच्या मदतीत वाढ करून १५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्रदय शस्त्रक्रिया तसेच किडणी रोपण या आजारांच्‍या रुग्‍णांना प्रत्‍येकी २५ हजार, डायलेसीसच्‍या रुग्णांकरीता १५ हजार रुपये आर्थिक मदत करण्‍याचा निर्णयही घेण्यात आला आहे. महापौर निधीला दानशूर व्यक्तींकडून मदत दिली जाते. त्याच्या व्याजामधून रुग्णांना आर्थिक मदत केली जाते. रुग्णांना देण्यात येणाऱ्या रक्कमेतून आर्थिक मदत करताना महापौर निधीमधील रक्कम कमी पडणार आहे.

महापौर निधीच्या रक्कमेत वाढ करता यावी म्हणून मुंबईमधील खासदार, आमदार, नगरसेवकांनी आपल्या एक महिन्याचे मानधन महापौर निधीसाठी द्यावे असे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले आहे. तसेच मोठ्या उद्योगपतींकडूनही महापौर निधीसाठी मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी मी स्वत: लोकप्रतिनिधी आणि उद्योगपतींना पत्र देऊन आवाहन करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

Intro:मुंबई - मुंबईमधील गरीब आणि गरजू रुग्णांना महापौर निधीमधून आर्थिक मदत केली जाते. रुग्णांना देण्यात येणाऱ्या मदत निधीमध्ये मागील महिन्यात वाढ करण्यात आली. मदत निधीमध्ये वाढ केल्यावर महापौर निधीमध्ये वाढ करता यावी म्हणून आज महापौरांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुंबईमधील खासदार, आमदार, नगरसेवक यांनी आपले एका महिन्याचे मानधन द्यावे तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचा पगार द्यावा असे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले आहे. मुंबईमधील उद्योगपतींकडून महापौर निधीसाठी मदत मागतील जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. Body:मुंबईमधील गरीब व गरजू रुग्णांना मुंबईच्या महापौर निधीमधून आर्थिक मदत केली जाते. महापौर निधीमधून २०११ पासून प्रत्येक गरजू रुग्णाला ५ हजार रुपये इतकी मदत केली जात होती. महापौर निधी समितीची बैठक होत नसल्याने व महापौर निधीमध्ये वाढ होत नसल्याने या निधीमध्ये गेल्या आठ वर्षात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नव्हती. महापौर निधीमधून आर्थिक मदत मिळेल या अपेक्षेने मुंबईकर मोठ्या प्रमाणात महापौरांकडे अर्ज करतात. मात्र निधी नसल्याने गरजू रुग्णांना जास्त रक्कम देता येत नव्हती. महापौर निधीमधून देण्यात आलेले ५ हजार रुपयांचे धनादेश अनेक रुग्णालये स्वीकारत नव्हती. यामुळे महापौर मदत निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मागील महिन्यात महापौर निधीबाबत बैठक घेण्यात आली. त्यात रुग्णांना देण्यात येणाऱ्या ५ हजार रुपयांच्या मदतीत वाढ करून १५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्दय शस्‍त्रक्रिया तसेच किडणी रोपण या आजारांच्‍या रुग्‍णांना प्रत्‍येकी २५ हजार डायलेसीसच्‍या रुग्‍णांकरिता १५ हजार रुपये आ‍र्थि‍क मदत करण्‍याचा निर्णयही घेण्यात आला आहे. महापौर निधीला दानशूर व्यक्तींकडून मदत दिली जाते त्याच्या व्याजामधून रुग्णांना आर्थिक मदत केली जाते. रुग्णांना देण्यात येणाऱ्या रक्कमेतून आर्थिक मदत करताना महापौर निधीमधील रक्कम कमी पडणार आहे.

महापौर निधीच्या रक्कमेत वाढ करता यावी म्हणून मुंबईमधील खासदार, आमदार, नगरसेवकांनी आपल्या एक महिन्याचे मानधन महापौर निधीसाठी द्यावे असे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले आहे. तसेच मोठ्या उद्योगपतींकडूनही महापौर निधीसाठी मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी मी स्वता लोकप्रतिनिधी आणि उद्योगपतींना पत्र देऊन आवाहन करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची बाईटConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.