ETV Bharat / city

Live Update Loudspeaker controversy : शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना जामीन - Live Update Loudspeaker controversy

BJP MP Navneet Rana
लाउडस्पीकरवरून वादंग
author img

By

Published : Apr 25, 2022, 12:16 PM IST

Updated : Apr 25, 2022, 5:48 PM IST

17:43 April 25

किरीट सोमैया हल्ला प्रकरण ; शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना जामीन

भाजपचे नेते किरीट सोमैया यांच्या ( Kirit Somaiya Attack Case ) कारवर शनिवारी हल्ला करण्यात आला होता. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यात सोमैया जखमी झाले होते. त्याप्रकरणी आता शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर अटक ( Vishwanath Mahadeshwar Arrested Mumbai Police ) करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना जामीन मिळाला आहे.

16:40 April 25

राणा दाम्पत्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा नाही

राणा दाम्पत्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला नसून न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळली आहे.

15:52 April 25

नवनीत राणावर या कारणावरून गुन्हा दाखल - सरकारी वकीलांनी दिली माहिती

१२४ A नुसार पहिल्या FIR मध्ये नमूद आहे. हनुमान चालीसा पठणसाठी एफआयआर दाखल करण्यात आला नाही. पोलिसांनी नोटीस देऊन त्यांना विनंती केली, कोणतीही कायदा सुव्यवस्था बिघडणारी कृत्य करू नका. जेव्हा पोलीस त्यांना ताब्यात घ्यायला घरी आले तेव्हा कायद्याचे पालन आरोपींनी केले नाही. पोलिसांबरोबर राणा पती पत्नीने हुज्जत घातली, वारंवार विनंती केली तरी राणा यांनी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला हात लावू नका असा वाद घातला. पोलिसांनी घेऊन जात असताना गाडीत बसताना सुध्दा हुज्जत घातली, पोलिसाशी धक्का बुक्की केली. अशी माहिती सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी दिली आहे.

14:52 April 25

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी नेहमीच - शरद पवार

पुणे - राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी नेहमीच दिली जाते, पण त्याचा काही परिणाम होत नाही. निवडणुकीची परिस्थिती उद्भवली, तर नुकत्याच झालेल्या कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निकालाने काय निकाल लागेल हे दाखवून दिले आहे, असे पुण्यात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

13:54 April 25

लाऊडस्पीकर वादावर केंद्र सरकाराला भेटण्यासाठी जाणार - आदित्य ठाकरे

राज्यातील लाऊडस्पीकर वादावर आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीत एका शिष्टमंडळाने केंद्र सरकारला भेटून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

13:48 April 25

मला पिण्याचे पाणीही दिले नाही - नवनीत राणांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी यात ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 'मी ठामपणे सांगते की, मी अनुसूचित जातीची आहे या कारणावरुन मला पिण्याचे पाणीही दिले नाही. माझे मुलभूत मानवी हक्क नाकारण्यात आले होते, माझा प्रामाणिक आणि प्रामाणिक विश्वास आहे की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सार्वजनिक जनादेशाचा विश्वासघात करून INC-NCP सोबत निवडणूकोत्तर युती करू इच्छित असल्याने ती आपल्या प्रचलित हिंदुत्व तत्त्वांपासून पूर्णपणे भरकटली आहे. असा आरोप त्यांनी केला आहे.

13:29 April 25

किरीट सोमैया प्रकरणात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना संपूर्ण रिपोर्ट सादर केला आहे.

13:23 April 25

आता संघर्ष केल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही - फडणवीस यांची ठाकरे सरकारवर कडाडून टीका

नवनीत राणा यांना जेल मध्ये अत्यंत हिन वागणूक दिली आहे. त्यांनी या संदर्भात लोकसभेचे सभापती यांच्याकडे तक्रार केली आहे. या महाराष्ट्राचे पुरोगामित्व आता संपलेले आहे असे म्हणावे लागत आहे. यांच्या बरोबर आता संघर्ष केल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. आमच्याशी ठोकशाहीने वागाल तर तसेच उत्तर देऊ. हे सरकारने ठरवा. भोंग्यांबाबत जे सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे निर्णय आहेत ते आम्हाला मान्य आहेत. काही विशिष्ट वेळा अवधी वाढून त्या पद्धतीने वागतो. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सुद्धा पत्रकार परिषदेत दाखल झाले आहे.

13:14 April 25

नवनीत राणा यांना तुरुंगात पिण्यासाठी पाणीही दिले नाही - फडणवीस

नवनीत राणा यांना तुरुंगात पिण्यासाठी पाणीही दिले नाही असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

12:56 April 25

हनुमान चालीसा वाचणे हे राजद्रोह आहे का? - फडणवीस

कोणी हिटलर प्रवृतीनी वागायचे ठरवले असेल तर बैठकीला जायला आम्हाला रस नाही. पोलिसांच्या समोर आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला होत असेल. व त्याबाबत एफआयआर ही घेतला जात नसेल तर काय उपयोग. ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांनी आमच्या पोलखोल सभेतील रथावर हल्ला केला. आमची लढाई सुरूच राहील. ज्या प्रमाणे किरीट सोमय्या व मोहित कंबोज यांच्यावर हल्ला झाला हे फक्त मुंबईतच नाही तर राज्यभर आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले व खोट्या केसेस होत आहेत. पोलिसांचा मोठा दुरुपयोग होत आहे. या गृहमंत्र्यांना काही अधिकार नाहीत. जे काही चालू आहे ते मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून होत आहे. ज्या बैठकीला मुख्यमंत्रीच नाहीत त्या बैठकीला जाऊन आम्ही काय करणार. हनुमान चालीसा म्हणण्यासाठी इतका विरोध का? एका स्त्री करता हजारो लोक जमा करता, त्यांच्या घरी जाऊन त्यांना अटक करता. एसटी कामगारांच्या आत्महत्या केलेल्या एखाद्या व्यक्तीच्या घरी जायचे ते बरे झाले असते. फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत हनुमान चालीसा म्हटली. हनुमान चालीसा म्हणणे राज्यात राजद्रोह असेल तर आमच्यावर राजद्रोह लावा. असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला होते.

12:38 April 25

किरीट सोमय्या गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेण्यासाठी गृह मंत्रालयात दाखल

  • Delhi | BJP leader Kirit Somaiya arrives at the Ministry of Home Affairs (MHA) to meet MoS Home Nityanand Rai.

    He had tweeted, "Today 12.30 BJP delegation meeting Nityanand Rai Home Minister (State) in connection with Maharashtra Govt issue." pic.twitter.com/UUZDndnkIu

    — ANI (@ANI) April 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजप नेते किरीट सोमय्या गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेण्यासाठी गृह मंत्रालयात पोहोचले आहेत. दरम्यान सोमैया यांनी ट्वीट करून म्हटले की, आज 12.30 भाजपचे शिष्टमंडळ महाराष्ट्र सरकारच्या मुद्द्यावर नित्यानंद राय गृहमंत्री (राज्य) यांची भेट घेत आहे.

12:30 April 25

भोंग्या संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला सुरुवात; अनेकांची अनुपस्थिती

भोंग्या संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात होत आहे. धार्मिक स्थळांवरील भोग्यांबाबत मार्गदर्शक तत्त्वांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर बैठकीला अनुपस्थित आहेत.

12:25 April 25

सोमैया हल्ल्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रीय गृहसचिव यांना पत्र

किरीट सोमैया यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिव यांना पत्र लिहून या बाबत माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कायदा व सुवेवस्था संदर्भात जी परिस्थितीत निर्माण झाली आहे, त्याबाबत तसेच भाजप नेते किरीट सोमैया व मोहित कंबोज यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी संदर्भात त्यांनी केंद्रीय गृह सचिवांना पत्र लिहिले आहे.

12:22 April 25

भाजप नेते किरीट सोमैया यांनी दिल्लीत गृहसचिवांची घेतली भेट

भाजप नेते किरीट सोमैया यांनी दिल्लीत गृहसचिवांची भेट घेतली. 20 ते 25 मिनीट ही भेट झाली. यामध्ये राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर आम्ही चर्चा केली. ( Kirit Somaiya Met Home Secretary ) त्यावर गृहसचिवांनी चिंता व्यक्त केली अशी माहिती सोमैया यांनी दिली आहे. यावर आम्हाला जे आवश्यक वाटेल ती कारवाई आम्ही करणार आहोत अशी ग्वाही गृहसचिवांनी आम्हाला दिली अशी माहितीही सोमैया यांनी दिली आहे. ते गृहसचिवांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

12:17 April 25

'ये लोग हैं fraud..bogus हमें हनुमान चालीसा सूनायेंगे.' - संजय राऊत

  • ये लोग हैं fraud..bogus
    हमें हनुमान चालीसा सूनायेंगे.. pic.twitter.com/moJ8CF9noD

    — Sanjay Raut (@rautsanjay61) April 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'ये लोग हैं fraud..bogus हमें हनुमान चालीसा सूनायेंगे.' संजय राऊत यांनी नवनीत कौर यांच्या जात प्रमाणपत्रातील एक फोटो शेअर करुन टीका केली आहे.

12:08 April 25

खासदार नवनीत राणा उच्च न्यायालयात

MP Navneet Rana : खासदार नवनीत राणा या एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात गेल्या आहेत.

Last Updated : Apr 25, 2022, 5:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.