ETV Bharat / city

Mumbai Crime : धक्कादायक! मतिमंद मुलीला कंटाळून आईने केली 19 वर्षाच्या मुलीची हत्या; अंधेरी स्टेशन हद्दीतील प्रकार - मुंबईत आईने केली मुलीची हत्या

अंधेरी पोलीस स्टेशनच्या ( 19 Year Old Girl Murder By Mother ) हद्दीत आईने आपल्या 19 वर्षाच्या मतिमंद मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आईने मुलीची हत्या केल्यानंतर पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी मुलीच्या आत्महत्येचा बनाव रचला.

Mumbai Crime
Mumbai Crime
author img

By

Published : Jun 16, 2022, 5:32 PM IST

मुंबई - अंधेरी पोलीस स्टेशनच्या ( 19 Year Old Girl Murder By Mother ) हद्दीत आईने आपल्या 19 वर्षाच्या मतिमंद मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आईने मुलीची हत्या केल्यानंतर पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी मुलीच्या आत्महत्येचा बनाव रचला. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आईला अटक केली आहे.

प्रतिक्रिया

आजारपणाचा खर्च परवडत नसल्याने हत्या - अंधेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पारशीवाडा परिसरात ही घटना घडली असून परिसरात या घटनेमुळे संतापाचे वातावरण आहे. 41 वर्षीय महिला अनेक वर्षापासून आपल्या मतिमंद मुलीसोबत रहात होती. मात्र मुलीच्या आजापणाचा खर्च आणि तिची देखभाल याने महिला त्रस्त होती. यातूनच आईने स्वतःचं मनोरुग्ण मुलीचा पट्याने गळफास लाऊन हत्या केली. विशेष म्हणजे हत्येनंतर आईनेच मुलीला गळफास लावून तिने आत्महत्येचा बनाव रचला. तसेच मुलीच्या आत्महत्येची माहिती कंट्रोल रुमला देत पोलिसांना पाचरण केले.

आईकडून गुन्ह्याची कबुली - या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. तपासा दरम्यान मतिमंद मुलगी अशा प्रकारची घटना कशी काय करू शकते, यावर पोलिसांना संशय आला. त्यानुसार पोलिसांनी डाॅक्टरांशी चर्चा करून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालात आधी मुलीची हत्या करण्यात आली असून नंतर तिला लटकवण्यात आल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांचा आईवरचा संशय बळावला. आईकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता. आईनेच गुन्ह्यांची कबूली दिली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत महिलेला अटक केली. अधिक तपास अंधेरी पोलीस करत आहेत.

हेही वाचा - Mumbai Congress Morcha : राजभवन परिसरात काँग्रेसचा महामोर्चा; नाना पटोले म्हणाले, हम झुकेंगे नही, डरेंगे नही, हम लढेंगे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.