मुंबई प्रत्येक गणेशोत्सवात "बाप्पा"वर आधारित अनेक गाणी प्रदर्शित होत असतात. या वर्षी जसराज जोशी आणि मधुर शिंदेच्या आवाजातील 'राडा' चित्रपटातील 'मोरया मोरया' गाणे करणार रसिकांच्या दिलावर राज्य करण्यासाठी सज्ज झाले Jasraj Joshi and Madhur Shinde's Rada Song Morya Morya आहे. ऍक्शन, कॉमेडी आणि रोमँटिक 'राडा' सिनेमाचे पहिले वहिले गणरायाला साद घालणारे 'मोरया मोरया' गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. गणरायाचे आगमन होताच आता कोणत्याही क्षणाचा विलंब न करता या चित्रपटातील गणपती सॉंग आजच्या या शुभदिनी प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. राम शेट्टी निर्मित 'राडा' या Rada Produced by Ram Shetty सिनेमातील 'मोरया मोरया' हे गाणे जाफर सागर लिखित असून संगीतकार दिनेश अर्जुना यांनी संगीताची धुरा वाहिली आहे. या गाण्यातील नृत्य फुलवा खामकर यांनी कोरियोग्राफ केले आहे.
'मोरया मोरया' गाणे प्रेक्षकांच्या मनात घर करेल राम शेट्टी निर्मित, रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प - पडगीलवार कॉर्पोरेशन यांच्या या चित्रपटात आकाश शेट्टीसह मिलिंद गुणाजी, संजय खापरे, गणेश यादव, अजय राठोड, गणेश आचार्य, निशिगंधा वाड, योगिता चव्हाण, सिया पाटील, हिना पांचाळ, शिल्पा ठाकरे या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले अशा तीनही धुरा पेलवल्या आहेत. तर हा भव्य ऍक्शनपट के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. गणरायाला वंदन करणारे हे 'मोरया मोरया' गाणे प्रेक्षकांच्या मनात घर करेलच यांत शंकाच नाही. येत्या २३ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात 'राडा' हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.