ETV Bharat / city

BMC Workers Corona Positive : मुंबई महापालिकेच्या ७ हजार ६८ कर्मचाऱ्यांना कोरोना, २५९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

author img

By

Published : Jan 6, 2022, 10:19 PM IST

मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी पालिकेचे कर्मचारी अधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. या कालावधीत कोरोनाचा प्रसार रोखणे, रुग्णांवर उपचार करणे, नागरिकांना सुविधा पुरवणे आदी कामे करताना पालिकेच्या ७ हजार ६८ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला ( BMC Workers Corona Positive ) आहे. त्यापैकी ६ हजार ५२९ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली असून २५९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

बीएमसी
बीएमसी

मुंबई - मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी पालिकेचे कर्मचारी अधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. या कालावधीत कोरोनाचा प्रसार रोखणे, रुग्णांवर उपचार करणे, नागरिकांना सुविधा पुरवणे आदी कामे करताना आतापर्यंत पालिकेच्या ७ हजार ६८ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला ( BMC Workers Corona Positive ) आहे. त्यापैकी ६ हजार ५२९ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली असून २५९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू हे घन कचरा विभाग आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे झाले आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पालिका कर्मचाऱ्यांना कोरोना -

मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. काही दिवसातच रुग्णसंख्या झपाट्याने वाढून मृत्यू होऊ लागले. यामुळे देशभरात टाळेबंदी लावण्यात आला. त्यानंतर मागील वर्षी फेब्रुवारी मार्च, २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. आता मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आली आहे. या तीनही लाटे दरम्यान पालिकेचे अधिकारी कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत होते. रुग्णांवर उपचार करणे, त्यांना क्वारंटाईन करणे, त्यांच्या संपर्कातील लोकांच्या चाचण्या करणे, कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना सोयी सुविधा पुरवणे, रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना जेवण पुरवणे, मुंबई स्वच्छ ठेवणे, नागरिकांना पाणी वेळेवर पुरवणे आदी कामे पालिकेचे कर्मचारी अधिकारी करत होते.

२५९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू -

कामादरम्यान पालिकेचे ७ हजार ६८ कर्मचारी अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह झाले. त्यापैकी ६ हजार ५२९ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. २८० कोविड बाधित कर्मचारी, अधिकारी उपचार घेत आहेत. तर २५९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. २५९ पैकी २२२ कर्मचारी, अधिकारी यांचे मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध झाले असून उर्वरित ३७ मृत अधिकारी, कर्मचारी यांचे मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध होणे बाकी आहे. २५९ मृत कर्मचाऱ्यांमध्ये 'अ' वर्गातील ४ अधिकारी, 'ब' वर्गातील १३ अधिकारी, 'क' वर्गातील ४४ अधिकारी, कर्मचारी तर 'ड' वर्गातील १९८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

मृत कर्मचारी, अधिकारी यांची खातेनिहाय माहिती -

खाते प्रमुख - २

कर व संकलन खाते - ७

घनकचरा खाते - ५७

आरोग्य खाते - ४५

अग्निशमन दल खाते - १२

सुरक्षादल खाते - १४

परिमंडळ - एक - ५

परिमंडळ - दोन - ४

शिक्षण खाते - ४

इतर विभाग खाते - १००

घनकचरा कंत्राटी कामगार - ९

एकूण २५९ मृत

हेही वाचा - BMC Becomes Corona Hotspot : मुंबई महापालिका मुख्यालय बनतेय कोरोना हॉटस्पॉट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.