ETV Bharat / city

वळण रस्ता नव्हे तर सरळ मार्गच धोक्याचे! राज्यातील 80 टक्क्यांहून अधिक अपघात सरळ मार्गांवर! - more than eighty percent accidents take place on straight roads, not on curvy roads

राज्यातील वाहन चालकांसाठी वळणा-वळणाचे, खड्डे पडलेले आणि विकासकामे सुरु असलेल्या रस्त्यांहून अधिक धोकादायक मार्ग हे सरळसोट रस्तेच ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कारण राज्यातील ८० टक्क्यांहून अधिक अपघात आणि मृत्यू हे सरळसोट मार्गांवर झाल्याची माहिती समोर आली आहे.

वळण रस्ता नव्हे तर सरळ मार्गच धोक्याचे! राज्यातील 80 टक्क्यांहून अधिक अपघात सरळ मार्गांवर!

author img

By

Published : Oct 12, 2021, 7:02 PM IST

मुंबई : राज्यातील वाहन चालकांसाठी वळणा-वळणाचे, खड्डे पडलेले आणि विकासकामे सुरु असलेल्या रस्त्यांहून अधिक धोकादायक मार्ग हे सरळसोट रस्तेच ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कारण राज्यातील ८० टक्क्यांहून अधिक अपघात आणि मृत्यू हे सरळसोट मार्गांवर झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मार्गांवरील वेग मर्यादा आणि इतर कारणांचा अभ्यास करण्याची गरज व्यक्त होत आहे.

८४ टक्क्यांपर्यंत वाढ-
गेल्या दोन वर्षांतील राज्यात झालेल्या अपघातांचा अभ्यास केला असता, सरळसोट मार्गांवरील अपघातांची टक्केवारी वाढत असल्याचे समोर आले आहे. २०१९मध्ये झालेल्या एकूण अपघातांमध्ये ७७ टक्के अपघात हे सरळ मार्गांवर झालेले होते. तसेच २०१९मधील एकूण अपघाती मृत्यूंमधील सरळ मार्गांवर झालेल्या मृत्यूंचे प्रमाण हे ७७ टक्के इतकेच होते. याउलट २०२०मध्ये झालेल्या एकूण अपघातांमधील सरळ मार्गांवर झालेल्या अपघाताच्या प्रमाणात ८४ टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे. तसेच सरळ मार्गांवरील अपघाती मृत्यूंचे प्रमाणही ८१ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात सरळ मार्गांवर अपघात होण्यासाठी वेग मर्यादा ओलांडणे, वाहनाचा टायर फुटणे, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटणे, चालकाचा डोळा लागणे अशी विविध कारणे असल्याचे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले. यामध्ये वेग मर्यादा ओलांडणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई केली जात आहे. मात्र इतर कारणांसाठी रोड इंजिनियरींगमध्ये बदल केला जात असून जनजागृती केली जात असल्याचे महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, वाहन चालकांनी काही गोष्टींची खबरदारी स्वतःहून घेण्याची गरजही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

अशी आहे आकडेवारी-
राज्यातील सरळ मार्गावर 2019 मध्ये, 25 हजार 370 अपघात झाले असून या अपघातात 9 हजार 871 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर 2020 मध्ये 20 हजार 9 हजार 414 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर राज्यातील वळणाचा रस्त्यावर 2019 मध्ये 4 हजार 271 अपघात झाले असून यामध्ये 1 हजार 585 जणांच्या मृत्यू झालेला आहे. तर 2020 मध्ये वळणाचा रस्त्यावर 2 हजार 522 अपघात झाले आहे. या अपघातात 1 हजार 289 जणांच्या मृत्यू झाले आहे. राज्यातील वाहन चालकांसाठी वळणा-वळणाचे, खड्डे पडलेले आणि विकासकामे सुरु असलेल्या रस्त्यांहून अधिक धोकादायक मार्ग हे सरळसोट रस्तेच ठरत असल्याचे आकडेवारीतून निदर्शनास येत आहे.

स्थानिक मार्ग अधिक जीवघेणे
राज्यातील एक्सप्रेस वेसह राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांहून अधिक अपघात आणि मृत्यू हे स्थानिक मार्गांवर होत असल्याचे महामार्ग पोलिसांचे म्हणणे आहे. २०२०मध्ये राज्यातील एक्सप्रेस वेवर एकूण १६१ अपघात झाले असून त्यात ६६ प्रवाशांचा मृत्यू झाला. २०२०मध्ये राज्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या ६ हजार ३४० अपघातांमध्ये ३ हजार ४६२ लोकांचा जीव गेला. २०२०मध्ये राज्य महामार्गांवरील एकूण ५ हजार ५१८ अपघातांमध्ये २ हजार ९७१ प्रवाशांची प्राणज्योत मालवली. २०२०मध्ये सर्वाधिक म्हणजे १२ हजार ९५२ अपघात स्थानिक मार्गांवर झाले असून त्यात तब्बल ५ हजार ०७० नागरिकांना प्राण गमवावे लागले.

हेही वाचा - गेल्या वर्षी कोरोनापेक्षा अधिक मृत्यू रस्ते अपघातांमुळे; वाहतूक उपायुक्तांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.