ETV Bharat / city

राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर, आज ८२९६ नवीन रुग्ण; तर १७९ रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना बातमी

गेल्या काही दिवसात राज्यातील मृत्यूदरात वाढ झाली आहे. राज्यात आज मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर पोहचला आहे. आज ८२९६ नवीन रुग्ण आढळून आले असून १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

more than eight thousand patient tested positive in maharashtra today
राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर, आज ८२९६ नवीन रुग्ण; तर १७९ रुग्णांचा मृत्यू
author img

By

Published : Jul 10, 2021, 10:28 PM IST

मुंबई - राज्यात गेले काही दिवस सहा ते नऊ हजाराच्या दरम्यान रोज नवे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्या मृत्यूच्या संख्येत सतत चढउतार सुरू आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील मृत्यूदरात वाढ झाली आहे. राज्यात आज मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर पोहचला आहे. आज ८२९६ नवीन रुग्ण आढळून आले असून १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आज १७९ रुग्णांचा मृत्यू -

राज्यात आज राज्यात ८,२९६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १७९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे. आज ६,०२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५९ ,०६,४६६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०५ टक्के झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,३८,००,१३९ नमुन्यांपैकी ६१,४९, २६४ म्हणजेच १४.०४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५,५८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४,७३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

मृत्यू दर वाढला -

मुंबईत आज १० जुलैला ८२९६ नवीन रुग्ण आढळून आले असून १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ९ जुलैला ८,९९२ नवीन रुग्ण आढळून आले असून २०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ८ जुलैला ९,११४ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर १२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ७ जुलैला ९,५५८ नवे रुग्ण आढळून आले असून १४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ६ जुलैला ८,४१८ नवे रुग्ण आढळून आले असून १७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५ जुलैला ६,७४० नवे रुग्ण आढळून आले असून ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४ जुलैला ९,३३६ नवे रुग्ण आढळून आले असून १२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४ व ५ जुलैला मृत्यू दर २.०१ टक्के इतका होता. ६ व ८ जुलैला मृत्यू दर २.०२ टक्के इतका झाला तर ९ जुलैला मृत्यू दरात वाढ होऊन तो २.०३ टक्के इतका झाला आहे. आज १० जुलैला मृत्यू दरात वाढ होऊन तो २.०४ टक्के झाला आहे.

या ठिकाणी आढळून आले सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई महापालिका - ५०३
  • रायगड - ४०९
  • अहमदनगर - ३५४
  • पुणे - ५५७
  • पुणे महापालिका - ३३०
  • सोलापूर - ३८१
  • सातारा - ८३९
  • कोल्हापूर - ११४६
  • कोल्हापूर पालिका - ३४७
  • सांगली - ८३२
  • रत्नागिरी ४४१

हेही वाचा - VIDEO खांद्यावर हात ठेवताच काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी कार्यकर्त्याला मारली थप्पड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.