मुंबई - देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन ऍपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आली होती. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत गुरुवारी 18 लसीकरण केंद्रांवर 105 बूथवर 4331 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली असून 6 जणांवर सौम्य दुष्परिणाम जाणवून आले. आतापर्यंत 62 हजार 954 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.
झालेले लसीकरण -
मुंबईत गुरुवारी 8064 लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. महापालिका, राज्य व केंद्र सरकारच्या एकूण 18 लसीकरण केंद्रांमधील 105 बूथवर 4331 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. मुंबईत आज(गुरुवारी) एकूण उद्दिष्टापेक्षा 54 टक्के लसीकरण करण्यात आरोग्य विभागाला यश आले. त्यात परळ येथील केईएम रुग्णालयात 554, सायन येथील टिळक रुग्णालय 224, विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटल 453, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय 614, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय 14, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय 417, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय 603, बिकेसी येथील जंबो हॉस्पिटल 411, बांद्रा भाभा हॉस्पिटल 172, भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे हॉस्पिटल 70, सेव्हन हिल 149, गोरेगाव नेस्को 165, मा हॉस्पिटल 88, कस्तुरबा हॉस्पिटल 59, सेंटेनरी गोवंडी हॉस्पिटल 65, दहिसर जंबो 96, एस के पाटील हॉस्पिटल 46, बीएआरसी 133 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
आतापर्यंत 62,954 लसीकरण -
16 जानेवारीपासून आतापार्यंत 62 हजार 954 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यात परळ येथील केईएम रुग्णालयात 8189, सायन येथील टिळक रुग्णालय 4172, विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटल 6451, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय 7891, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय 1303, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय 9454, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय 9461, बिकेसी येथील जंबो हॉस्पिटल 6670, बांद्रा भाभा हॉस्पिटल 3771, भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे हॉस्पिटल 495, सेव्हन हिल 2597, गोरेगाव नेस्को 2013, मा हॉस्पिटल 88, कस्तुरबा हॉस्पिटल 59, सेंटेनरी गोवंडी हॉस्पिटल 65, दहिसर जंबो 96, एस के पाटील हॉस्पिटल 46, बीएआरसी 133 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.