ETV Bharat / city

heirs of Corona warriors कोरोना योध्यांचे १०० हुन अधिक वारस आर्थिक मदत, नोकरीपासून वंचित - पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई महापालिकेच्या Mumbai Municipality कोरोना योध्यांचे bmc mumbai corona yodha १०० हुन अधिक वारस More than 100 heirs of Corona warriors आर्थिक मदत, नोकरीपासून वंचित आहेत deprived of financial help job कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागासह इतर विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी जीवाची बाजी लावली. यात २७० पालिका कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यातील १७७ कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. तर १६० वारसांना नोकरी देण्यात आली आहे.

bmc mumbai
मुंबई महापालिका
author img

By

Published : Aug 28, 2022, 5:06 PM IST

मुंबई मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. अडीच वर्षात ११ लाख ३३ हजार १७२ मुंबईकरांना कोरोनाची बाधा झाली. तर १९ हजार ६६४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या. गरिबांना अन्न वाटप, कंटेनमनेंट झोनची अंमलबजावणी, रुग्णांवर उपचार, रुग्णांना रुग्णालयात ने आन करणे, मुंबईची स्वच्छता राखणे, मुंबईकरांना पाणीपुरवठा करणे, नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा देणे आदी कामे महापालिका कर्मचाऱ्यांकडून केली गेली. ही कामे करताना मुंबई महापालिकेच्या २७० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. Death of 270 employees of Mumbai Municipal Corporation यामध्ये सर्वाधिक मृत्यू घनकचरा, आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांचा होता.

१७७ जणांना आर्थिक मदत, १६० वारसांना नोकरी कोरोना दरम्यान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करु असे पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांनी जाहिर केले होते. यामुळे पालिकेने आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ५० लाखांची आर्थिक मदत आणि एका वारसाला नोकरी देण्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र केंद्र सरकारने कोरोना योद्धा म्हणून पालिकेने पाठवलेले बहुतेक दावे फेटाळून लावले आहेत. २७० पैकी २३ जणांना केंद्र सरकारच्या माध्यमातून ५० लाखांची मदत करण्यात आली. मुंबई महापालिकेने १७७ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत दिली आहे. तसेच शहीद झालेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या १६० वारसांना पालिकेच्या नोकरीत समावून घेतले आहे.

मदत व नोकरी देण्याची कार्यवाही मुंबईमध्ये सध्या कोरोना आटोक्यात असला तरी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची योजना ऑक्टोबर २०२२ पर्यंत सुरु राहील. ज्यांना अद्याप आर्थिक मदत देण्यात आली नाही, किंवा ज्यांच्या वारसांना नोकरी देण्यात आली नाही त्यांना या कालावधीत मदत व नोकरी देण्याची कार्यवाही करण्यात येईल. ज्या मृत कर्मचार्‍यांचे वारस लहान आहेत, १८ वर्षे पूर्ण झाली नाहीत, अशा सर्वांना वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर नोकरी देण्यात येईल, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आयुक्तांनी आपला शब्द पाळावा पालिका कर्मचाऱ्यांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. त्यांच्या कुटूंबियांना कोरोना योद्धा म्हणून ५० लाखांची मदत देण्याचे तसेच त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आले. त्यापैकी बहुतेक प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळले. केंद्र सरकारने कोरोना योद्धा म्हणून मदत केली नाही तरी पालिका त्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत देईल, त्यांच्या एका वारसाला नोकरी दिले असे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी जाहीर केले होते. पालिका आयुक्तांनी केलेल्या घोषणेप्रमाणे सर्वच मृत पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपये द्यावेत तसेच वारसांना नोकरी द्यावी अशी मागणी मुंबई मनपा कार्यालयीन कर्मचारी संघटना व मुंबई मनपा कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीचे ऍड. प्रकाश देवदास यांनी केली आहे.

हेही वाचा Garment Businessman Accident अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सुमारे 4 कोटी रुपये अपघाती विमा देण्याचे न्यायालयाचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.