मुंबई - कोविड -19 महामारीच्या पार्श्वभूमीवर अल्पकालीन पावसाळी अधिवेशनाची सांगता आज झाली. दोन दिवसांच्या कालावधीमध्ये एकूण बैठकांची संख्या दोन होती. प्रत्यक्षात एकूण कामकाज नऊ तास आणि तीस मिनिटे झाले. अन्य कारणामुळे वाया गेलेला वेळ एक तास दहा मिनिटांचा होता. रोज सरासरी चार तास चाळीस मिनिटे कामकाज पार पडले. विधानसभेत एकूण 11 विधेयके पुनर्स्थापित झाली. दोन दिवसाच्या कामकाजात विधानसभेने 12 विधेयके संमत केली असून विधानपरिषदेकडून आलेले एक विधेयक संमत झाले.
महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवार दिनांक 7 डिसेंबर 2020 रोजी विधान भवन नागपूर मध्ये घेण्यात येईल, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अधिवेशन पुढील बैठकीपर्यंत अनिश्चित काळासाठी स्थगित करताना सांगितले.